शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चोरीतील अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: February 26, 2017 00:50 IST

येथील साईनगर परिसरातील विमल मेश्राम यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

 दोघांना अटक : तीन लाखांच्या मुद्देमालाचा शोध आर्वी : येथील साईनगर परिसरातील विमल मेश्राम यांच्या घरी झालेल्या जबरी चोरीत दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यापासून आतापर्यंत २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरीतील सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल अद्याप चोरट्यांच्या हवालीच आहे. त्याचा शोध आर्वी पोलीस करीत असून तो लवकरच हाती येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटकेतील आरोपी विनोद दयाराम कुथे (३७) रा. हनुमान वॉर्ड आणि भुरे खाँ उर्फ सलीम उर्फ सल्लू रा. इंदिरा कॉलनी बैतुल गंज, बैतुल ता.जि. बैतुल, मध्यप्रदेश या दोघांकडून चोरीत वापरलेला चाकू, दुचाकी, आलमारी तोडण्याकरता वापरलेली लोखंडी टॉमी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. यासह चोरीतील सोन्याच्या पाटल्याचे तुकडे ५८ हजार २२० ग्रॅम किंमत १ लाख ४२ हजार १५७ रुपये, दोन डोरले असलेले मंगळसूत्र १० ग्रॅम अंदाजे किंमत २५ हजार, सोन्याची चैन १५ ग्रॅम किंमत ४५ हजार रुपये, कानातील टॉप्स एक जोडी ५ हजार रुपये, सोन्याची अंगठी १० ग्रॅम किंमत २५ हजार असा एकूण २ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर मुद्देमालाचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तसेच विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक चौधरी व उपनिरीक्षक हिवाळे तसेच गुन्हे अन्वेषण पथकाचे कर्मचारी जमादार गजानन लामसे, अमित जुवारे, विक्की मस्के, राजेश राठोड, गजानन वडनेरकर, विशाल मडावी, नितीन चौधरी, प्रवीण देशमुख, अतुल अडसड, भूषण निघोट यांनी केली.(शहर प्रतिनिधी)