विसाव्या पशुगणनेत जिल्ह्यातील पशुधन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:01+5:30

विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.

In the twentieth livestock census, the livestock in the district decreased | विसाव्या पशुगणनेत जिल्ह्यातील पशुधन घटले

विसाव्या पशुगणनेत जिल्ह्यातील पशुधन घटले

googlenewsNext
ठळक मुद्देवाढत्या शहरीकरणाचा परिणाम : शेळ्या-मेंढ्यांची संख्याही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने झालेल्या २०व्या पशुगणनेत पाळीव पशुंच्या संख्येत घट झालेली आहे. झपाट्याने होत असलेले शहरीकरण, चारा सोडून नगदी पिके घेण्याकडे असलेला शेतकऱ्यांचा कल याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा जोडधंदा केला जातो. यातून घरखर्च बऱ्यापैकी निघतो. मात्र, उन्हाळ्यात भासणारी वैरण टंचाई, पशुखाद्याचे गगनाला भिडणारे दर यामुळेही पशुपालनात घट होत असल्याचे दिसून येते. देशात जनगणना दर दहा वर्षांनी तर पशुगणना दर पाच वर्षांनी होते. १९ वी पशुगणना २०१२ मध्ये पूर्ण झाली. २०१२ च्या १९ व्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गार्इंची संख्या ३ लाख ४ हजार ३५९, म्हशी ४८ हजार ७९३, शेळ्या १ लाख ३० हजार ३४२, मेंढ्या १ हजार ६८५, वराहांची संख्या २ हजार ८१० इतकी होती.
विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योजना राबविणे सुलभ व्हावे याकरिता पशुगणना होते. यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने टॅबद्वारे गणना झाली.
जिल्ह्यात पशुधनाची संख्या प्रशासनाच्या लेखी घटती असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादन घेतले जाते. त्यामुळे विसाव्या पशुगणनेनुसारच जिल्ह्यात पाळीव जनावरांची संख्या असल्याने १९ व्या पशुगणनेनुसार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाची दर्शविली जाणारी आकडेवारी साशंकता निर्माण करणारी ठरत आहे.

गार्इंच्या संख्येत २८ तर म्हशींच्या संख्येत २ हजारांनी झाली घट
१९ व्या पशुगणनेच्या तुलनेत संकरित आणि देशी गार्इंची संख्या २८ हजार ४७९, तर म्हशींच्या संख्येत २ हजार १४४ ने घट झालेली आहे. मात्र, शेळ्यांच्या संख्येत ३१ हजार १७, तर मेंढ्यांच्या संख्येत ३ हजार ६७३ ने वाढ झालेली असल्याने शेतकºयांचा पशुपालनासोबतच शेळीपालनाकडेही मोठा कल दिसून येत आहे.

Web Title: In the twentieth livestock census, the livestock in the district decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय