शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत तिहेरी लढतीचे चित्र

By admin | Updated: October 7, 2016 02:13 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता १८ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहे.

प्रचार शिगेला : १३४२ मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्यसमुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता १८ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटना असे मिळून माजी आमदार राजू तिमांडे यांचे पॅनल आहे. दुसरे आ. कुणावार व शफात अहमद यांचे परिवर्तन पॅनल तर तिसरे शिवसेना समर्पित पॅनल आहे. यामुळे तिहेरी लढत असून प्रचारातील रणधुमाळी माजली आहे.१८ जागांपैकी ग्रा.पं. मतदार संघात ५५४ मतदार असून दोन जागा सर्वसाधारण, एक जागा दुर्बल घटक तर एक अनु. जाती, जमातीकरिता राखीव आहे. सेवा सहकारी मतदार संघात ६४३ मतदार असून ११ जागा आहे. यातील सात जागा सर्वसाधारण, दोन महिला राखीव, एक विमुक्त भटक्या जाती तर एक जागा इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. अडते व्यापारी मतदार संघात ९६ मतदार असून ते दोन जागेवर व्यापारी व अडत्यांना निवडून देतील. हमाल व्यापारी मतदार संघात ४९ मतदार असून ते एक हमाल वा व्यापारी प्रतिनिधींना निवडून देतील.सदर मतदार संघ संपूर्ण समुद्रपूर तालुक्यात व्यापला आहे. स्वत: आ. कुणावार व सहकार नेते शफात अहमद, किशोर दिघे, आनंदराव थुटे हे परिवर्तन पॅनलकरिता प्रचारात मेहनत घेत आहे. माजी आमदार तिमांडे, अ‍ॅड. कोठारी, व्यापारी असो.चे अध्यक्ष शांती गांधी हे प्रचारात उतरले आहे. शिवसेना समर्पित पॅनलकरिता माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र लढी, प्रमोद भटे यांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. तीनही गटाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ८ आॅक्टोबरला उमेदवाराचे भाग्य पेटी बंद होणार आहे. या तिहेरी लढत काट्याची व अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)