शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला आठ दिवसांत पावणे दोन कोटींचे वाहतूक उत्पन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

‘ब्रेक द चेन’अंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात वर्धा विभागाचे ९ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची आता पूर्णक्षमतेने धावत आहे.  राखी पौर्णिमेपूर्वी फारशी प्रवासी संख्या राहत नसल्याने १८० ते २०० बसेस सोडण्यात येत होत्या. राखीपौर्णिमेपासून सर्वच २१० गाड्या धावत आहेत. २१ ते २८ ऑगस्टच्या कालावधीत वर्धा विभागाला १ कोटी ७६ लाखांचे वाहतूक उत्पन्न मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनलॉकनंतर आता एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. राखी पौर्णिमेपासून सर्वच फेऱ्या सुरू झाल्याने २१ ते २८ ऑगस्ट या आठ दिवसांच्या कालावधीत वर्धा विभागाला १ कोटी ७६ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटीचा रुतलेला गाडा आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आल्याने मागीलवर्षी तब्बल पाच महिने एसटीची चाके जागीच थांबली होती. या काळात वर्धा विभागाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला. ऑक्टोबरअखेर एसटीचा गाडा सुरळीत झाला. मात्र, याहीवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मृत्यूनेही तांडव घातले. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात वर्धा विभागाचे ९ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची आता पूर्णक्षमतेने धावत आहे. राखी पौर्णिमेपूर्वी फारशी प्रवासी संख्या राहत नसल्याने १८० ते २०० बसेस सोडण्यात येत होत्या. राखीपौर्णिमेपासून सर्वच २१० गाड्या धावत आहेत. २१ ते २८ ऑगस्टच्या कालावधीत वर्धा विभागाला १ कोटी ७६ लाखांचे वाहतूक उत्पन्न मिळाले. 

जुलैचे वेतन थकीत

मागीलवर्षीपासून कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊन करण्यात आले. तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याहीवर्षी कोरोनाने मार्च महिन्यापासून कहर केल्याने दीड महिना एसटी बंद होती. त्यामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. एसटीचा गाडा पूर्वपदावर येत आहे. मात्र, अपेक्षित निधीअभावी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिना सुरू होऊनही जुलैचे वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. वेतन तातडीने देण्याची मागणी चालक, वाहक, कर्मचाऱ्यांतून होत आहे. 

 

टॅग्स :state transportएसटी