महावितरण अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:18+5:30

जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला.

Torture of the officers of the Department of Mahavitaran and Agriculture | महावितरण अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

महावितरण अन् कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहारचा ठिय्या : मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहे. इतकेच नव्हे तर हवालदील झालेल्या शेतकºयांच्या कृषीपंपाला रात्रीच्या सुमारास विद्यृत दिल्या जात आहे. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात प्रहार जनशक्तीपक्षाच्यावतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, कृषी विभागाकडून कुठलाही नियोजनबद्ध कार्यक्रम आखून बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जात नसल्याचा आरोप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला. पूर्वीच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी केले. तर दुसरे आंदोलन महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसाला विद्युत पुरवठा करण्यात यावा. शिवाय रसुलाबाद परिसरातील तक्रारी निकाली काढण्यात याव्या आदी मागण्या या आंदोलनादरम्यान रेटण्यात आल्या. याप्रसंगी अधीक्षक अभियंता वानखेडे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे देवळी विधानसभा प्रमुख तथा रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी केले. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बैठक बोलावली होती. याच बैठकीदरम्यान कार्यालयातच ठिय्या देण्यात आला.

Web Title: Torture of the officers of the Department of Mahavitaran and Agriculture