आॅनलाईन प्रक्रियेमुळे थकले तीन हजार शिक्षकांचे वेतन

By Admin | Updated: October 15, 2015 02:23 IST2015-10-15T02:23:35+5:302015-10-15T02:23:35+5:30

शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला व्हावे, या हेतुने शिक्षण विभागाने शालार्थ सेवा प्रणाली ही आॅनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केली; पण ही प्रणाली डोकेदुखी ठरत आहे.

Tired of three thousand teachers due to online process | आॅनलाईन प्रक्रियेमुळे थकले तीन हजार शिक्षकांचे वेतन

आॅनलाईन प्रक्रियेमुळे थकले तीन हजार शिक्षकांचे वेतन

आॅफलाईन प्रक्रिया सुलभ : जि.प. शिक्षण विभाग जबाबदार
अनिल रिठे तळेगाव (श्या.पं.)
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला व्हावे, या हेतुने शिक्षण विभागाने शालार्थ सेवा प्रणाली ही आॅनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केली; पण ही प्रणाली डोकेदुखी ठरत आहे. मागील महिन्यापासून सुमारे अडीच ते तीन हजार प्राथमिक शिक्षकांचे वेतन थकले आहे. यामुळे आॅनलाईन सोडून जुनी आॅफलाईन पद्धतच चांगली, अशा प्रतिक्रीया शिक्षक व्यक्त करतात.
राज्यात शिक्षकांचे वेतन १ तारखेला व्हावे, यासाठी शालार्थ सेवा प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण विभागाला राष्ट्रीयकृत बँक व कोअर बँकेतून शिक्षकांचे वेतन करायचे होते. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व आॅनलाइन आहे. यासाठी मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी या चार प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली. ही प्रणाली राबविण्यासाठी शिक्षण विभागाकडून कालावधी निश्चित करण्यात आला. महिन्याच्या १ तारखेलाच वेतन जमा व्हावे, यासाठी मुख्याध्यापकाने १० तारखेपर्यंत वेतन देयके गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे देणे, त्यांनी ती तपासून १५ तारखेपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांना सोपविणे व शिक्षणाधिकाऱ्याने २५ तारखेपर्यंत ती देयके मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याकडे देणे व शेवटी ती कोषागाराकडे द्यावी, अशी पद्धत आहे.

Web Title: Tired of three thousand teachers due to online process