शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन हत्यांचा उलगडा तर एकातील आरोपी फरारच

By admin | Updated: March 30, 2017 00:44 IST

पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकाच महिन्यात हत्येच्या चार घटना घडल्या. यातील तीन हत्यांचा उलगडा झाला

एकाच महिन्यात पुलगाव ठाण्यांतर्गत चार हत्या वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत एकाच महिन्यात हत्येच्या चार घटना घडल्या. यातील तीन हत्यांचा उलगडा झाला असून चपराशाच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नाही. पांडे हत्येतील चौथा आरोपी जेरबंद दखनीफैल भागातील सचिन महादेव पांडे (३०) याची २० मार्चला हत्या झाली. यात पुलगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक केली; पण सलमान फरार होता. बुधवारी पोलिसांनी त्यालाही अटक केली. मद्यशौकीन सचिन पांडे २० मार्चला रात्री सलमानच्या गाडीवर बसला. यातून वाद होऊन सलमानसह शेख नासिर शेख इस्माईल (३०), अलताफ अली बक्श बब्बु अली बक्श (२७) व टिपू उर्फ अमीर खान मुमताज खान (२४) सर्व रा. पुलगाव यांनी त्याला लोखंडी रॉडने मारून ठार केले. यातील तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला अशोकनगर येथील शशांक प्रशांत करवाडे (२५) याची डॉ. आंबेडकरनगर येथील अल्पेश सदानंद टेंभुर्णे याने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना २७ मार्चला दुपारी घडली. यातील आरोपीला पोलिसांनी धामणगाव (रेल्वे) येथून अटक केली. बहिनीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी अल्पेशने शशांकची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. अल्पेशची बहीण मयूरी हिने आत्महत्या केली होती. यात शशांक करवाडे व त्याच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल होता. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तेव्हापासून तो बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्याच्या तयारीत होता, असे तपासात समोर आले. पोलिसांनी गुन्ह्यातील चाकू व इतर साहित्य जप्त केले. पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९ ते २७ मार्चपर्यंत चार हत्यांचा तपास ठाणेदार मुरलीधर बुराडे व विवेक बन्सोड करीत आहे.(शहर प्रतिनिधी) शिपायाचा मारेकरी फरार न.प. च्या आयएम शाळेत चपराशी म्हणून कार्यरत युवराज बाळकृष्ण रामटेके याची हत्या १९ मार्चला सकाळी उघड झाली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला; पण तपासात उलगडा झाला नाही. शिवाय यातील मारेकरीही अद्याप फरार आहे. न्यायालयीन कोठडी इंझाळा येथील संजय व नत्थूजी होले या बाप-लेकाच्या ९ मार्च रोजी घडलेल्या हत्येप्रकरणी महादेव बरडे या आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे.