सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:55+5:30

स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपये चोरून नेले. तर चोरट्याने रितेशच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या सुरेश चंदनखेडे यांच्या घरातून मोबाईल व रोख नऊ हजार ४०० रुपये पळविले.

Three burglaries broke out in a security check | सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी

सुरक्षा यंत्रणा दक्ष असताना तीन ठिकाणी घरफोडी

Next
ठळक मुद्देआंजी (मोठी) येथील घटना : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर उपस्थित केले जात आहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : एका महत्त्वपूर्ण विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होणार असल्याने शनिवारी जिल्ह्यातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा दक्ष होती. असे असतानाही शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी आंजी (मोठी) येथील तीन घरांना टार्गेट करून सदर घरांमधुन मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस असली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक वॉर्ड ४ मधील रितेश चंदनखेडे हे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेगावला गेले होते. कुलूपबंद घर आणि परिसरात कुणी नसल्याची संधी साधून चंदनखेडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातील ५ ग्रॅम सोन्याचे लॉकेट किंमत २० हजार रुपये तसेच रोख रोख ८०० रुपये चोरून नेले. तर चोरट्याने रितेशच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या सुरेश चंदनखेडे यांच्या घरातून मोबाईल व रोख नऊ हजार ४०० रुपये पळविले. घटनेच्यावेळी सुरेश चंदनखेडे हे आणि त्यांचे कुटुंबीय घरात झोपून होते. तसेच चोरट्यांनी सुनील विपूलवार यांच्या घराचे दार आतून बंद असताना मोठ्या चतुराईने ते उघडले. शिवाय सुनील विपूलवार यांच्याकडे दिवाळी निमित्त आलेल्या सुनीलच्या बहिनीचा मोबाईल व बॅग मधील २ हजार रुपये रोख चोरून नेली. सकाळी या तिन्ही घटना उघडकीस येताच चांगलीच खळबळ उडाली होती. गावात तीन घरी चोरी झाल्याची वार्ता परिसरात वाºयासारखी पसरल्याने घटनास्थळी बर्घ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची तक्रार खरांगणा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास खरांगणा (मो.) चे ठाणेदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आंजी पोलीस चौकीचे कामडी, गायकी, चंदनखेडे, मसराम, बमनोटे करीत आहेत.

आंजीवासीय आठवड्याभरात दुसऱ्यांदा टार्गेट
यापूर्वी आंजी येथील तीन घरांना टार्गेट करून एका घरातून मुद्देमाल लंपास केला. त्या घटनांची नोंदही पोलिसांनी घेतली आहे. सदर घटना ताजी असतानाच आठवड्या भऱ्याच्या कालावधीतच चोरट्यांनी पुन्हा आंजी (मोठी) येथील तीन घरांवर लक्ष केंद्रीत करून मुद्देमाल पळविला. यामुळे पोलीस अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Web Title: Three burglaries broke out in a security check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर