शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांवर वाघाच्या हल्ल्याने दहशत

By admin | Updated: February 5, 2015 23:15 IST

हमदापूर शिवारात वाघाने हल्ला करून एक वासरू ठार केले़ ही घटना गुरूवारी (दि़५) उघडकीस आली़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे़

सेवाग्राम : हमदापूर शिवारात वाघाने हल्ला करून एक वासरू ठार केले़ ही घटना गुरूवारी (दि़५) उघडकीस आली़ यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे़ हमदापूर येथील दशरथ महादेव देवतळे यांचे बोंडसुला मार्गावर हमदापूर शिवारात शेत आहे. शेतातच त्यांची बैलजोडी, गाय, गोऱ्हे आणि वासरू असते. गुरूवारी पहाटेच्या सुमारास निलेश देवतळे हा झाडझूड करण्यासाठी शेतात गेला असता जनावरे घाबरलेली आणि एक वर्षाची कालवड दिसली नाही. शोध घेतला असता ५० किमीच्या जवळपास झुडपाकडे वासराचे मुंडके नसलेले धड दिसून आले. हे पाहून वाघानेच हल्ला केला असावा, या शंकेने घाबरून त्याने घर गाठले़ याबाबतची माहिती पोलीस पाटील अतुल कांबळे, उपसरंच संजय देशमुख, जि.प. पशुचिकित्सालय केंद्राचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण भानसे यांना दिली. डॉ. भानसे घटनास्थळाची पाहणी केली असता वाघानेच शिकार हल्ला करून कालवड ठार केल्याचे सांगितले. त्या ठिकाणी वाघाच्या पंजाचे निशाणही आढळून आले़हमदापूर सर्कलमधील ही चवथी घटना आहे. चानकी येथील मनीष तुपकर यांच्या एका दोन वर्षांच्या गोऱ्ह्याला वाघाने २९ एप्रिल रोजी ठार केले़ वसंता राऊत रा. कोपरा यांच्या संकरीत गाईला ३ एप्रिल रोजी मारले. भैय्याजी लांबट रा़ चानकी यांची जर्सी जातीच्या कालवडीवर २ मे रोजी हल्ला करून ठार केले़ वघाळ्याचे माजी पं़स़ सभापती श्रीराम तुमडाम यांना त्यांच्या परिसरात वाघाचे दर्शन झाले. २०१४ मध्ये तीन ठिकाणी वाघाने हल्ला केल्याने ग्रामस्थांत धास्ती आहे़ ही चवथी घटना आहे़ वाघाचे वास्तव्य निश्चित झाल्याने शेतातील कामे थांबली आहेत़(वार्ताहर)