शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

गचाळ कार्यप्रणालीमुळे हजारो क्विंटल तूर बेवारस

By admin | Updated: May 13, 2017 01:15 IST

शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली.

अवकाळी पावसाने केली व्यवस्थेची पोलखोल लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा उसना आव आणून नाफेडद्वारे शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. त्यातही शासकीय यंत्रणेच्या ‘नव दिन मे ढाई कोस’ या म्हणी प्रमाणे कासवगतीनेच तुरीची खरेदी करण्यात आली. २४२७.९७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असताना गुरूवारी दुपारी ४ वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेकडो क्विंटल तूर भिजल्याचे समजते. परंतु, बाजार समितीकडून घटनेला दुजोरा दिल्या जात नव्हता. तुरीची संथगतीने होणारी खरेदी पाहून शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला. त्यानंतर नाफेडनेही २२ एप्रिलपासून खरेदी बंद केली. ११ मेपर्यंत स्थानिय कृउबात एकूण २४२७.९७ क्विंटल तूरीच खरेदी करण्यात आली. ही तूर मार्केट मध्येच पडलेली असतानाच गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुसळदार पाऊस झाला. यात शेकडो क्विंटल तुरी भिजल्याचे समजते. परंतु बाजार समितीद्वारे या घटनेला दुजोरा मिळू शकला नाही. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्यानंतर राज्य शासनाने बाजार समितीच्या माध्यमातून ३ मे २०१७ पासून तूर खरेदी सुरू केली आहे. ११ मेपर्यंत २४२७.९७ क्विंटल तूर खरेदी केल्याचे कृउबाचे सचिव राजपूत यांनी सांगितले. खरेदी केलेली तूर बाजार समितीचे यार्डामध्ये पडून असून गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे यार्डात पाणी साचले. तुरीच्या पोत्याखालून पाणी गेल्याने खालील भागातील तूर ओली होणे स्वाभाविक आहे. बहुतांश तुरीचे पोते ताडपत्रीने झाकले असले तरी शेकडो क्विंटल तूर भिजल्याचा अंदाज आहे. या संदर्भात कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजपूत यांनी सांगितले की, तुरीचे ढीग नसून ही तूर पोत्यामध्ये भरली आहे. या पोत्यावर मोठमोठ्या ताडपत्र्या झाकल्याने पावसामुळे तूर ओली होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मागणी नाफेडतर्फे २२ एप्रिल पासून तूर खरेदी बंद केली. मार्केट यार्डमध्ये व शेतकऱ्यांकडे अजुनही बरीच तूर पडुन आहे. नाफेडची खरेदी बंद होताच नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना माल द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांना १००० ते १२०० रूपयाचे नुकसान सहन करावे लागत असल्याने तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल कृउबाच्या यार्डमध्ये खरेदी करावा अशी मागणी भाजपाचे मंगेश झाडे, राजकुमार पनपालीया, कपील शुक्ला यांनी सभापती खडसेंकडे केली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे -देशमुख मुख्यमंत्र्यांनी तुर खरेदीत मुदत वाढ देण्याचे जाहीर केले होते;पण शहानिशा केली असता अद्यापही कुठलाही आदेश संबंधीतांना प्राप्त नाही. आश्वासन पाळण्याची मागणी वर्धा कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी केली.