शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल्ससह ज्वेलरी शॉपला चोरट्याने केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

ज्वेलरीच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाखाचा तर मेडिकल्स शॉपमधून पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ऐन बाजार ओळीतील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला.

ठळक मुद्दे३.०५ लाखाचा मुद्देमाल लंपास : वडनेर गावासह परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर :  येथील एका ज्वेलरी शॉपसह मेडिकल्सला चोरट्याने टार्गेट करून या दोन्ही दुकानांमधून तीन लाख पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे गाव व परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक बाजारपेठेतील गुरुश्री ज्वेलर्स तसेच श्रीराम मेडिकल्स या दोन दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. ज्वेलरीच्या दुकानातून चोरट्यांनी तीन लाखाचा तर मेडिकल्स शॉपमधून पाच हजाराचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. ऐन बाजार ओळीतील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपनिरीक्षक सोनपितळे करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ वडनेर पोलिसांच्या सुमारे तीन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. लवकरच चोरट्यांना जेरबंद करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून असा विश्वास सध्या पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

हिंगणी-घोराड मार्गावर धाडसी घरफोडीसेलू (घोराड) : कुलूपबंद घराला टार्गेट करून घरातील तीन हजार रुपये चोरून नेण्यात आले. ही घटना हिंगणी-घोराड मार्गावरील दीपक आनंद झोरे यांच्या घरी घडली. दीपक झोरे यांचे घोराड शिवारात हिंगणी मार्गावर घर आहे. त्यांच्या शेजारी दीपक यांचे बंधू तुळशीराम झोरे राहत असून, ते दवाखान्यात गेले होते तर दीपक हे ब्राम्हणी येथील शेतात गेल्याने घराला कुलूप होते. याच संधीचे सोने करीत चोरट्याने भरदुपारी दीपक यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तीन हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. दीपक हे घरी परतल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच सेलू पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Thiefचोर