शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

दारू पकडायला गेले अन्् मदत करून आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रात्रीला वीज नाही अशा परिस्थितीतही फासे पारधी समाजाच्या २० कुटूंबातील १२५ व्यक्ती कवाडी तांड्यावर राहतात. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांची लॉकडाऊनमुळे मोठी कुचंबना झाली. मागील ५० दिवसांपासून या लोकांच्या हाताला काम राहिलेल नाही. महिन्याला रेशन दुकानातून मिळणारे धान्य या शिवाय दुसरी कुठलीही मदत त्यांना मिळत नाही.

ठळक मुद्देकवाडी तांड्यावरील परिस्थितीने हेलावले मन

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नजीकच्या कवाडीतांडा परिसरात लॉकडाऊनच्या काळात दारूसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. परंतू या पारधी तांड्यावरील २० कुटुंबातील १२५ लोकांची व्यथा पाहून पोलीस प्रशासनही पाणावले व या कुटूंबाला तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या पुढाकाराने साहित्य पोहचविण्याचे काम करण्यात आले. तांड्यावरचा हा अनुभव प्रशासनालाही धक्का देणारा ठरला.खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रात्रीला वीज नाही अशा परिस्थितीतही फासे पारधी समाजाच्या २० कुटूंबातील १२५ व्यक्ती कवाडी तांड्यावर राहतात. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांची लॉकडाऊनमुळे मोठी कुचंबना झाली. मागील ५० दिवसांपासून या लोकांच्या हाताला काम राहिलेल नाही. महिन्याला रेशन दुकानातून मिळणारे धान्य या शिवाय दुसरी कुठलीही मदत त्यांना मिळत नाही. दारू पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांच्या समोर फासे पारधी बांधवानी आपल्या समस्येची जंतरीच मांडली. लहान मुलांना सोबत घेवून अंधारात त्यांना दिवस काढावे लागतात. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हॅन्डपंप देण्यात आला आहे; पण तो नादुरूस्त असल्याने दुरून पाणी आणावे लागते. या सर्व बाबीची माहिती पोलीस उपनिरीक्षकांनी तहसीलदार चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी लगेच जीवनावश्यक साहित्याच्या २० किट या कुटूंबासाठी पाठविल्या. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून येथे विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच हॅन्डपंप नादुरूस्त असल्याने तो दुरूस्त करण्याबाबत पं.स. प्रशासनाला कळविण्यात आले. या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वितरीत करताना नायब तहसीलदार विनायक मगर, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, विजय वरकड, आकाश अजमिरे, पठाण डेहणकर, कैलास अजमिरे उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी