शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तपूर परिसरातून मातीची चोरी

By admin | Updated: June 4, 2014 00:14 IST

दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.

तहसीलदारांची कारवाई : चार बैलबंड्या पकडल्या; दंड वसूलवर्धा : दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या मालकीच्या शेतातून नालवाडी, साटोडा, कारला परिसरातील चोरांनी माती व मुरूम चोरण्याचा सपाटा सुरू केला होता. याची माहिती संस्थेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. यावरून तहसीलदारांनी कारवाई करीत चार बैलबंड्यांना माती चोरताना रंगेहात पकडले. त्यांना १२ हजार ८00 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. संस्थेच्या शेतातून माती चोरून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे अनेक वेळा समोर आले. याबाबत संस्थेने  या माती चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला.; परंतु हे लोक मारहाण करण्याकरिता धावून येतात. या मातीचोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता संस्थेच्या एका सुरक्षारक्षकास मारहाण करून जखमी करण्यात आले. यामुळे संस्थेने या घटनेची तक्रार जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणे (सेवाग्राम) येथे दिली. यावर जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी कार्यवाही करीत चार बैलबंडी धारकांना महारोगी सेवा समितीच्या शेतातून माती चोरताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मंगेश श्रीधर मते रा. कारला रोड, मोतीराम दादाजी भोयर रा. साटोडा, प्रवीण मारोती उके व सुमेध चतुर्धन उके दोन्ही रा. नालवाडी यांच्या माती व मुरूम भरलेल्या बैलगाड्या पकडून जप्त केल्या. त्यांना प्रत्येकी ३ हजार २00 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.या कार्यात सेवाग्राम पोलीस ठाण्याचे  कोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव चाफले, पोलीस शिपाई पाटील यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी मसराम व  नालवाडीचे तलाठी खडतकर यांनी जप्तीचे कार्य केले. या कार्यात महारोगी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)