शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल ग्राम योजना उद्दिष्टाला हरताळ

By admin | Updated: July 31, 2014 00:12 IST

हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राबविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त

विरुळ(आकाजी) : हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राबविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावातील नागरिकच उघड्यावरच शौचास बसत असल्याने या योजनेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा मूलमंत्र प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पुढे आली. ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासनाने निर्मलग्राम योजना सुरू केली. या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च केले. परंतु ही योजना प्रत्यक्षात न उतरता केवळ कागदावर राहिली. ग्रामस्वच्छता अभियानात गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा म्हणून अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. पारितोषिकही जाहीर करण्यात आले. परंतु केवळ पुरस्कार आणि स्तुतिसुमने स्वीकारण्यासाठी योजनेचा उपयोग झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील तपासणी पथकाने भेटी दिल्या तेव्हा प्रत्यक्ष गावाची पाहणी न करता या पथकांतील अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यातच गावकऱ्यांनी धन्यता मानली. आर्वी तालुक्यातही पुरस्कार प्राप्त गावाची हीच स्थिती आहे. या योजनेची पुरती वाट लागली असून पुरस्कार प्राप्त गावातील नागरिक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर शौचास बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात शिरताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.(वार्ताहर)