शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात तणाव वाढला; बाजारात ड्रायफ्रुट्स महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

देशात अफगाणिस्तानसह  इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी  सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. काजूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अंजीर, खजूर, पेंडखजूर, काळा मनुका, पिस्ता यांच्या किमतीचीही १० टक्क्यांनी वाढल्या.

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम शहरातील सुकामेव्याच्या बाजारावर  झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह अफगाणिस्तानातून होणारी सुकामेव्याची आवक थांबल्याने बदामाच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. बदामाचे दर प्रतिकिलो  ८०० रुपयांवरुन  १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. काजू, अंजीर, जर्दाळू पिस्त्याचेही भाव वाढले असून आणखी वाढण्याची शक्यता सुकामेवा विक्रेत्यांनी व्यक्त केली.अफगाणिस्तानातील घडामोडींपूर्वी शहरातील बाजारपेठेत बदामाचे भाव प्रतिकलो ८०० रुपये होेते. तर अंजीर ६०० ते ७००, पिस्ता ६५० ते ७००, जर्दाळू ५०० ते ५५० काजू ८०० ते ८५० रुपये प्रतिकिलो होते. मागील काही महिन्यांपासून हे दर स्थिर होते. देशात अफगाणिस्तानसह  इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी  सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. काजूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अंजीर, खजूर, पेंडखजूर, काळा मनुका, पिस्ता यांच्या किमतीचीही १० टक्क्यांनी वाढल्या.

१५ दिवसांचाच स्टॉक शिल्लक - अफगाणिस्तानातील घडामोडींचे पडसाद वर्ध्याच्या बाजारपेठेतही उमटले असून आवक थांबली आहे.- बाजारपेठेतील किराणा व्यावसायिक सुकामेवा विक्रेत्यांकडे १५ दिवस पुरेल इतका साठा आहे. - आणखी दोन महिन्यापर्यंत सुकामेव्याचे दर वाढलेलेच असतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली.  

दर पूर्ववत होणे कठीण

देशात अमेरिकेसह अफगाणिस्तान आणि इतर भागातून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे काजू बदामसह सर्वच सुकामेव्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आणखी दोन महिने भाव वाढलेलेच राहण्याची शक्यता आहे.-इद्रिस मेमन,सचिव, व्यापारी असोसिएशन, वर्धा.

मध्यंतरी काही महिने सुकामेव्याचे दर स्थिर होते. अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे सुकामेव्याची आवक थांबली असल्याने काजू, बदाम व इतर सुकामेव्याचे दर प्रचंड वधारले आहेत.  अशीच परिस्थिती राहिल्यास सुकामेव्याचे दर पूर्ववत होणे कठीण असून सणासुदीच्या दिवसात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे.-प्रवीण बोरले,  व्यावसायिक, वर्धा. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान