शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शेतकऱ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसादरम्यान पेरणीची कामे आटोपली. तर सध्या सोयाबीन पिकाची वाढ किमान सहा इंचापर्यंत झाली आहे. असे असले तरी सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण; पण वरुणराजा देतोय हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून आतापर्यंत जिल्ह्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिवाय पीकही अंकुरले आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊसच बेपत्ता झाल्याने ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’ असे म्हणण्याची वेळ सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न पडल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदाच्या वर्षी किमान १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसादरम्यान पेरणीची कामे आटोपली. तर सध्या सोयाबीन पिकाची वाढ किमान सहा इंचापर्यंत झाली आहे. असे असले तरी सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या समस्येला तोंड देत असतानाच जिल्ह्यात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी अंकुरलेल्या पिकाला पाणी देऊन पिकाचे संगोपन करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. तर ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. 

आठ दिवस पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अटळ- जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २२९.२४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाला असून, येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. सध्या अंकुरलेल्या सोयाबीन पिकाची उंची सहा इंचापर्यंत आहे. परंतु, काही भागातील सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसताे. त्यामुळे कृषी विभाग जिल्ह्यात खोडमाशी निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. आठ दिवसांत दमदार पाऊस झाल्यास उभ्या पिकांना नवसंजीवनी मिळेल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा. 

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

मागील काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. शिवाय सध्या ऊन तापत आहे. यामुळे याचा विपरीत परिणाम उभ्या पिकावर होत आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावेल अशी परिस्थिती सध्या आहे.- संजय वाकडे,                                                 शेतकरी, नांदोरा. 

वघाळा परिसरात सोयाबीन, तूर व कपाशीचे उत्पन्न शेतकरी घेतात. या भागात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली आहेत. पण सध्या पाऊस बेपत्ता झाल्याने अडचणीत भर पडली आहे. रुसलेला वरुणराजा वेळीच प्रसन्न होऊन जिल्ह्यात बरसला पाहिजे. अन्यता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येईल.- गजानन जिकार, शेतकरी, वघाळा.

सोयाबीनचा पेरा वाढलामागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. नेमका किती हेक्टरने यंदा सोयाबीनचा पेरा वाढला हे कृषी विभागाच्या अंतिम खरीप पीक पेरा अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. यंदा १.१० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाचा आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती