शिक्षकांना मिळणार संपूर्ण वाहतूक भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:31+5:30

प्राथमिक शिक्षकांना मे व जून महिन्यात ३० दिवसांच्यावर सुटी असल्याने त्यांना वाहन भत्ता दिल्या जात नाही. पण, दीर्घ सुटीच्या काळात प्रशिक्षणासाठी वा इतर शैक्षणिक किंवा प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्यालयाच्या हद्दीत किंवा बाहेर पाठविल्यास त्यांची सुटी खंडीत झाल्याचे समजावे, दैनिक भत्ता, मोफत वाहन सेवा तसेच इतर सुविधेचा लाभ मिळत नसेल तर वाहतूक भत्ता देण्यात येईल.

Teachers will get full transport allowance | शिक्षकांना मिळणार संपूर्ण वाहतूक भत्ता

शिक्षकांना मिळणार संपूर्ण वाहतूक भत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन ओंबासे। राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ साठी जिल्ह्यात सेवा अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना मे आणि जून महिन्याचा पूर्ण वाहतूक भत्ता देण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मे आणि जून महिन्याचा संपूर्ण वाहतूक भत्ता देण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओब्मासे यांनी परिपत्रकाद्वारे काढला आहे.
प्राथमिक शिक्षकांना मे व जून महिन्यात ३० दिवसांच्यावर सुटी असल्याने त्यांना वाहन भत्ता दिल्या जात नाही. पण, दीर्घ सुटीच्या काळात प्रशिक्षणासाठी वा इतर शैक्षणिक किंवा प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्यालयाच्या हद्दीत किंवा बाहेर पाठविल्यास त्यांची सुटी खंडीत झाल्याचे समजावे, दैनिक भत्ता, मोफत वाहन सेवा तसेच इतर सुविधेचा लाभ मिळत नसेल तर वाहतूक भत्ता देण्यात येईल.
पण, प्रशिक्षण किंवा शैक्षणिक कार्य पार पाडण्यासाठी व्यतीत केलेला कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून नियमित केला असेल तर या कालावधीत वाहतूक भत्ता मिळणार नसल्याचे आदेशात नमूद आहे. मे आणि जून महिन्यात प्राथमिक शिक्षकांच्या कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनेमध्ये निगराणी पथक, नोडल अधिकारी, आदी कार्यात सेवा अधिग्रहीत करून नियुक्त्या करण्यात आल्या आहे.
त्या शिक्षकांना अटी व शर्तीनुसार मे आणि जून महिन्याचा वाहनभत्ता देण्यात येणार आहे. व्यतीत केलेला संपूर्ण कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून नियमित करण्यात आला असेल तरच शिक्षकांना वाहनभत्ता मंजूर करण्यात येणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी काढलेल्या परित्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Teachers will get full transport allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक