शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा शमविणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य

By admin | Updated: July 29, 2014 23:59 IST

बदलत्या काळानुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. कालचे ज्ञान आज काळाच्या कसोटीवर जुनाट ठरत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत असून नव्या पिढीची ज्ञानलालसा वेगाने वाढत आहे.

वर्धा : बदलत्या काळानुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. कालचे ज्ञान आज काळाच्या कसोटीवर जुनाट ठरत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत असून नव्या पिढीची ज्ञानलालसा वेगाने वाढत आहे. ही ज्ञानसंपदानाची भूक शमविण्यासाठी शिक्षकांनी तत्पर राहून आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करुन ज्ञानदानाच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले.सालोड(हिरापूर) येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या रचना शारीर विभागात आयोजित राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष विभाग, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही सहा दिवसीय कार्यशाळा पार पडली. उद्घाटन समारोहाला मार्गदर्शक म्हणून डॉ. दिनकर थत्ते, डॉ. नीलम गुप्ता, संस्थेचे कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य व वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम भुतडा, समन्वयक व्ही. आर. मेघे, उपप्राचार्य व रचना शारीर विभागप्रमुख डॉ. प्रीती देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत डॉ. थत्ते, डॉ. गुप्ता यांच्यासह कर्नाटक येथील डॉ. गिरीधर कंठी, डॉ. एन. मुरलीधरा, डॉ. बी. जी. कुलकर्णी, डॉ. सुधीरकुमार, डॉ. दिनकर शर्मा तसेच डॉ. मुकुंद एरंडे, डॉ. सरोज पाटील, डॉ. संयुक्ता गोखले, डॉ. भूषण लाखकर, डॉ. प्रीती देसाई या तज्ज्ञांनी उपस्थित शिक्षक प्रतिनिधीशी संवाद साधला.कार्यशाळेला महाराष्ट्रासह तामिळनाडू, कर्नाटक, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ, उत्तराखंड, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली येथील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांना भेट माहिते घेतली. या सहा दिवसीय कार्यशाळेत रचना शारीर विषयातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी प्र्राप्त झाल्याने अद्यावत अभ्यासक्रमाबाबत नवी दिशा व दृष्टी मिळाली, असा अभिप्राय या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या कार्यशाळेकरिता रचना शारीर विभागाचे डॉ. सचिन खेडीकर, डॉ. गौरव सावरकर, डॉ. उमेश येळणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)