शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनावर जि.प. शिक्षण विभागाच्या गोंधळाचे सावट

By admin | Updated: August 26, 2015 02:11 IST

शिक्षकांकरिता महत्त्वाचा असलेला शिक्षक दिन आठवड्यावर आला आहे. यात जिल्हा परिषदेच्यावतीने या दिनाकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते;...

शिक्षक पुरस्काराबाबत अद्याप बैठक नाही : सर्वत्र बदली व नियुक्तीच्या वादाची चर्चा वर्धा : शिक्षकांकरिता महत्त्वाचा असलेला शिक्षक दिन आठवड्यावर आला आहे. यात जिल्हा परिषदेच्यावतीने या दिनाकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते; मात्र यंदाच्या सत्रात या दिनाला जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या घोळाचे ग्रहण लागल्याचे दिसते. आठवड्यावर आलेल्या शिक्षक दिनाकरिता अद्याप जिल्हा परिषदेत एकही बैठक झाली नसल्याची माहिती आहे.शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत असलेल्या काही शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात येतो. याकरिता त्यांना प्रस्ताव सादर करण्याची आजपर्यंतची प्रथा आहे. यंदा मात्र शिक्षकांना पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव न मागविता त्या भागातील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची माहिती गोळा करून यातील निवडक शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे शिक्षण सभापतींनी जाहीर केले होते. त्यांच्या सांगण्यानुसार गटशिक्षणाधिकारी कामाला लागले; मात्र जिल्हा स्तरावर या संदर्भात कुठलीही बैठक झाली नसल्याने यंदा शिक्षकाना पुरस्कार मिळतील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत समाावेशित शिक्षकांच्या नियुक्तीत शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या उत्तरपत्रिका बदलविण्याच्या कारभारामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. यातून सुटका करण्याकरिता त्यांना फरार राहून अटकपूर्व जामीन मिळवावा लागला. या सर्व प्रकारात काही दिवसांवर असलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाकरिता शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जि.प. दिसून येत आहे.(प्रतिनिधी)