सुरक्षा भिंतीचे काम कासवगतीने

By Admin | Updated: September 19, 2015 03:32 IST2015-09-19T03:32:44+5:302015-09-19T03:32:44+5:30

तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू आहे.

Tackling the security wall | सुरक्षा भिंतीचे काम कासवगतीने

सुरक्षा भिंतीचे काम कासवगतीने

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐेरणीवर : कॉलमच्या खड्ड्यात साचले पाणी
वर्धा : तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. भिंत बांधण्याकरिता खोदण्यात आलेले कॉलमचे खड्डे उघडे असून यात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे डासांची पैदास होऊन याचा परिअसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे मुरुम टाकुन भरण्याची मगाणी ग्रामस्थांनी केली आहे.
कॉलमकरिता खड्डे खोदले. मात्र हे बांधकाम सध्या स्थगित केले असून या खड्ड्यात पाणी साचून डासांची पैदास होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tackling the security wall