शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेच्या व्रती सुशीला नायर

By admin | Updated: December 26, 2015 02:16 IST

महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले.

१०१ वी जयंती : बहुआयामी व्यक्तिमत्व
दिलीप चव्हाण सेवाग्राम
महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले. स्वातंत्र्यपूर्वीचे आरोग्य सेवेचे व्रत स्वातंत्र्यनंतर अधिक जोमाने करून बापूंनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी कस्तुरबा दवाखाना व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रूपाने पूर्ण केली. त्या उत्तम डॉक्टर तर होत्या, सोबतच स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवी, सहित्यिक, वक्ता, चित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आरोग्य सेवेच्या व्रती म्हणूनच त्यांचे जीवन समर्पित राहिले. २६ डिसेंबरला त्यांची १०१ वी जयंती साजरी होत आहे.
डॉ. सुशीला नायर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील कंजा गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानमध्ये आहे. शीख परिवारातील असल्या तरी म. गांधींच्या प्रेरणादायी सानिध्यात राहण्याचे भाग्य त्यांचे मोठे बंधु प्यारेलालजींमुळे लाभले. भावाप्रमाणे आपले जीवनही बापू समर्पित करण्याचा निर्धार करून सामाजिक बदल, रचनात्मक कार्यक्रम व आरोग्य सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले.
साबरमती आश्रम सोडल्यानंतर बापू सेवाग्रामला आले. आश्रम स्थापन झाल्यानंतर डॉ. सुशीला नायर आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आश्रमात आल्या. ग्रामोन्नती व स्वातंत्र्य चळवळीचे कार्य जोमाने सुरू झाले. प्यारेलालजी कार्यालयाची जबाबदारी सांभाळत. बापूंनी आरोग्य सेवेचे काम डॉ. सुशीला (बहणजी) यांच्यावर सोपविले. यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज (आखरी निवास) यांचे निवास स्थान देण्यात आले. कार्यकर्ता तसेच ग्रामस्थांवर त्या उपचार करू लागल्या. चव्हाण परिवाराच्या वाड्यात प्रार्थना, कताई व आरोग्य सेवेचे काम केले. १९४२ ला भारत छोडो ठराव झाला. या आंदोलनात बापूंसोबत त्या मुंबईला गेल्या. सर्वांना अटक करून पुण्याच्या आगाखॉ पॅलेसमध्ये ठेवले. २१ महिने बापूंची आरोग्य सेवा व सचिवाचे काम सांभाळले. बहणजींनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग ग्रामीण लोकांसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक आरोग्यासाठीही झाला.

बहणजींनी संस्थेत खादी व प्रार्थना अनिवार्य केली. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामस्थांना सेवा देण्यास कुणी तयार नव्हते. यासाठी त्यांनी स्रानोकोत्तर प्रवेशास ग्रामीण भागात दोन वर्षांची सेवा अनिवार्य केली. यातून ग्रामीण भागाशी वैद्यकांचा संपर्क वाढला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत गांधी व विचारांची परीक्षा आवश्यक केली.