शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बससाठी विद्यार्थ्यांची सायंकाळपर्यंत फरफट

By admin | Updated: September 29, 2014 23:10 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही

आकोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत नाहक प्रतीक्षा करावी लागते. विभागाकडून बसकरिता केलेले वेळापत्रकाचे पालन होत नाही. हे यावरुन दिसून येते. मात्र यात विद्यार्थ्यांची नाहक फरफट होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता नियमित शहरात येतात. येथील ग्रामीण भागात सातवी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणाकरिता शहर गाठावे लागते. हे विद्यार्थी अप-डाऊन करीत असल्याने त्यांना बसवर निर्भर असावे लागते. वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात शिकणारी ही मुले कायम बसच्या प्रतीक्षेत असतात. श्रीकृष्ण हायस्कुल व दिनकर विद्यालय येथे शिकणारे विद्यार्थी यांना बसच्या अनियमततेचा फटका सहन करावा लागतो. नानाविध अडचणीतुन ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शिकवितात. ही मुले सकाळी सात वाजता शाळेकरिता घरुन निघतात. सायंकाळपर्यंत उपाशीतापाशी कधी सुकळी फाट्यावर तर कधी वर्धा बसस्टँड, आर्वी नाका येथे बसची प्रतीक्षा करीत असतात. शाळेनजीकच्या विनंती थांब्यावर जांभया देत झाडाच्या आडोशाने ही मुले उभी दिसतात. सकाळी शाळा, कॉलेजला जातांनी वेळेवर बस येते. पण परतीच्या वेळी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची ताटकळ होते. वेळापत्रकच पाळले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर बस येणे अपेक्षीत असताना सुर्य मावळतीला गेला तरी बस येत नाही. यात सुधारणा करुन परतीच्या वेळेतील बस वेळेवर सोडण्याची मागणी आहे.(वार्ताहर)