शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाचा तडाखा; घरांची पडझड

By admin | Updated: June 14, 2014 23:46 IST

आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष

प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून वीज खंडितआर्वी, कारंजा (घा़) : आर्वी व कारंजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली़ या वादळी पावसाचा मात्र अनेक गावांना तडाखा बसला़ कारंजा तालुक्यात ४० घरांची पडझड झाली तर अनेकांचे नुकसान झाले़ आर्वी तालुक्यात वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खंडित झाली़कारंजा तालुक्यातील ढगा आणि गारपीट या दोन गावांत गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले़ जंगलव्याप्त गावांत ४० ते ४५ घरांचे छत उडाले. टिनपत्रे व कवेलू उडाल्याने शेकडो ग्रामस्थ उघड्यावर आले. कुडाची घरे जमीनदोस्त झालीत़ गारपीट या गावात ७१ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ६४ हजारांचे नुकसान झाले़ सहा कोठे अंशत: तर पाच कोठे जमीनदोस्त झाले़ यात ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले़ ३५ ते ४० घरांची पडझड झाली. ढगा गावात ३७ घरे अंशत: पडली़ यात २ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले़ नुकसानीची पाहणी रात्री नायब तहसीलदार बर्वे, तलाठी व त्यांच्या चमूने केली. आर्वी तालुक्यातही गुरूवारी रात्री वादळी पावसाचे आगमन झाले़ यात नांदपूर, शिरपूर, वर्धमनेरी, खुबगाव, वाठोडा, निंबोली, वागदा, सर्कसपूर, वाढोणा, जळगाव, बाजारवाडा आदी गावांत जोरदार पावसाची नोंद झाली़ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती़ काही ठिकाणी वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता़ टाकरखेडा येथेही वादळी पावसामुळे अनेकांच्या घरांची टिनपत्रे उडालीत़ वादळी वाऱ्याने अनेक झाडे उन्मळून पडली़ यामुळे वाहतूक ठप्प होती़ (तालुका प्रतिनिधी)