शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने केळीची बाग जमीनदोस्त

By admin | Updated: July 27, 2014 00:14 IST

संततधार वादळी पाऊस अनेकांना आर्थिक फटका देऊन गेला. पावसाच्या प्रतिक्षेनंतर उशिरा का होईना; पण पाऊस आला. शेतकरी जोमाने पेरणीला लागला; पण या वादळी पावसाने कपाशी, सोयाबीन,

सेलू : संततधार वादळी पाऊस अनेकांना आर्थिक फटका देऊन गेला. पावसाच्या प्रतिक्षेनंतर उशिरा का होईना; पण पाऊस आला. शेतकरी जोमाने पेरणीला लागला; पण या वादळी पावसाने कपाशी, सोयाबीन, भाजीपाला व सेलू तालुक्याचे केळीचे अस्तित्व टिकविण्याऱ्या बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रेहकी येथील शेतकऱ्याला तर सुमारे साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला़ यामुळे पूरते हादरले आहेत़ शेताची पाहणी करण्यासाठी अधिकारीही टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे़रेहकी येथील शेतकरी बाबा ज्ञानेश्वर धानकुटे यांची २५ ते ३० किलो वजनाचे केळीचे घडांनी लदबदलेली बाग वादळामुळे जमिनदोस्त झाली़ यामुळे सदर कुटुंबाची अवस्था बिकट झाली आहे. सदर शेतकरी महसूल विभागाकडे केळीची बाग बघायला या, नुकसान भरपाई मिळावी म्हणून काहीतरी करा, असा टाहो फोडत सेलूत चकरा मारत आहे; पण त्याला सांत्वना देण्यासही कुणाला वेळ नसल्याचेच दिसून आले़ सदर शेतकऱ्याची दोन एकरातील हाती आलेली केळीची बाग वादळी पावसामुळे कोलमडली़ यात त्याला साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला. सदर शेतकऱ्याकडे पाच एकर ओलित व आईच्या नावे साडेतीन एकर कोरडवाहू जमीन आहेत़ यात दोन भावांचा नऊ सदस्यांचा प्रपंच आहे. शेतीत अख्खे कुटूंब कष्ट करते. केळी हेच त्यांचे मुख्य व नगदी पैसा देणारे पीक आहे. तेही हातचे गेले तर आता पूढील कार्य करायचे कसे, लोकांचे पैसे द्यायचे कुठून असे गंभीर प्रश्न बाबा धानकुटे यांच्यापूढे उभे ठाकले आहेत़ गावातील तलाठ्याला माहिती देण्यात आली; पण त्यांनीही नुकसानाची पाहणी करण्याचे सौजन्य दाखविले नाही़ महसूल व कृषी विभागाने सूचना मिळताच त्याच्या बागेला भेट देणे, पंचनामा करणे व शासन पाठीशी असल्याचा धीर देणे गरजेचे होते; पण त्याकडे कुणीही फिरकले नाही़ शेतकरी इच्छामरणाची भाषा बोलू लागल्याने त्याची मानसिकता किती टोकाला पोहोचली आहे, हे समजून घेणे सध्या गरजेचे झाले आहे़ शेतकरी दोन दिवसांपासून महसूल विभागात चकरा मारत आहे; पण बघु, करू, अमक्या दिवशी शेतावर येऊ, असे सांगून शेतकऱ्याची बोळवण केली जात आहे़ कायद्याच्या चौकटीत सदर शेतकऱ्याला किती नुकसान भरपाई द्यायची, हा शासनाचा भाग असला तरी किमान अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्याला न्याय देणे गरजेचे आहे़ महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रेहकी येथील शेतकऱ्याच्या केळीच्या बागेमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी करावी व नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी माणगी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)