शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: March 30, 2017 00:49 IST

गोदामाची उपलब्धता, मापाई व तोलाईसाठी आवश्यक मनुष्यबळ असल्याने रोहणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे.

जनमंचची मागणी : संपूर्ण तूर खरेदी करावी रोहणा : गोदामाची उपलब्धता, मापाई व तोलाईसाठी आवश्यक मनुष्यबळ असल्याने रोहणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. येथील तूर खरेदी केंद्र सुरू केल्यास आर्वी केंद्रातील भार कमी होईल. तसेच शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर शासनाने खरेदी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी जनमंचने केली आहे. मागील वर्षी तुरीची डाळ २०० रूपये प्रतिकिलो होती. डाळीच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या तुरीला चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांना तुरीसाठी मिळालेले चांगले दर पाहता पेरा वाढविला. तूर डाळीचा साठेबाजीचा प्रकार पुढे आल्याने सर्वत्र धाडसत्रांचा अवलंब करण्यात आला. त्यातच महाराष्ट्र शासनाने तुरीचा दर नियंत्रण कायदा करण्यासाठी प्रारूप केंद्र सरकारला पाठविले. मात्र केंद्राने सदर प्रारूप फेरविचारासाठी राज्य शासनाकडे पाठविले. शेतमालावर आधारित असलेल्या पक्क्या उत्पादनांची भाववाढ कायम असताना शासनाने त्याकडे डोळेझाक केली आहे. मुंगाची डाळ ६५ रूपये किलो असताना त्याच डाळीपासून निर्मित पदार्थ २८० रूपये किलो दराने विकले जात आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मालाची भाववाढ झाल्यावर ओरड होते. मात्र शेतकऱ्यांना एरवी कमीभाव मिळतो याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. मागच्या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा वाढविला. सुदैवाने यंदा पिकही समाधानकारक आले. तुरीचे उत्पादन १६ दशलक्ष टनावरून २२ दशलक्ष टनावर गेले. बाजारातील तुरीचे भाव कोसळले. शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात तुरी पडून आहे. मात्र खरेदी करणारी शासकीय यंत्रणा अत्यंत संथगतीने काम करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात तूर विकावी लागत आहे. आर्वी केंद्रावर शेतकऱ्यांनी तुरी विकण्यासाठी केलेल्या नोंदीपैकी केवळ १६० शेतकऱ्यांच्या तुरी मोजल्या आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत येथे नंबर लागेल काय अशी शंका शेतकऱ्यांना आहे. रोहणा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे तूरी पडून आहे. येथे पणन महासंघाचे मोठे गोदाम रिकामे पडून आहे. हे गोदाम तूर साठवणुकीला सहज उपलब्ध होवू शकते. रोहणा येथे नाफेडकडून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी प्रमोद पांडे, बाबासाहेब गफाट, रघाटाटे, सरपंच सुनील वाघ, प्रकाश टाकळे आदींनी केली आहे.(वार्ताहर)