शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या महारक्तदानाला तरुणांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित  शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या.  वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमहायज्ञातून वाहिली बाबूजींना आदरांजली : वर्धा, देवळी, आर्वी शहरात रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/देवळी/आर्वी : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या अंतर्गत वर्धा, देवळी व आर्वी येथेही रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिराला रक्तदानासाठी तरुणांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिसून आला.देवळी येथील खासदार रामदास तडस क्रीडा संकुलात आयोजित  शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सूचिता मडावी होत्या.  वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या हस्ते करण्यात आले. तर आर्वी येथील एसएसबी हॉस्पिटल येथे आयोजित  रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांच्या हस्ते करण्यात आले. तीनही ठिकाणी रक्तदान शिबिराला महिला-पुरुष, तरुण-तरुणी तसेच नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

- लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत ३ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत साई सभागृह नंदोरी मार्ग, हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला हिंगणघाट व परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवार ४ जुलै रोजी सेलू येथे कुंभार सभागृह, शितलदास मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट