शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पेरले, उगवलेही; हाती आला मातेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाहिल्यावर भरघोस उत्पन्न होईल,असे हा शेतकरी सांगत होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला.

ठळक मुद्देजामणी येथील शेतकऱ्याची व्यथा : लागवड खर्चही ठरला व्यर्थ; आर्थिक मदत देण्याची शेतकरी बांधवांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा सोयाबीन उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला. नजीकच्या जामनी येथील एका शेतकऱ्याला तीन एकरात सोयाबीनचे उत्पन्न घेण्यासाठी २८ हजार रुपयांचा खर्च आला. पण प्रत्यक्षात सोयाबीनची मळणी केल्यावर शेतकऱ्याला दीड क्विंटल सोयाबीनच्या मातीऱ्यावर समाधान मानावे लागल्याने केलेला खर्चही व्यर्थ ठरला .जामनी येथील शेतकरी सुरेश कामडी यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीन एकर शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरुवातीला झालेला पाऊस आणि पिकाची योग्य पद्धतीने निगा राखल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिकाची परिस्थिती पाहिल्यावर भरघोस उत्पन्न होईल,असे हा शेतकरी सांगत होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला. त्यामुळे सोयाबीन काळे पडले. चिकणीसह परिसरात तीन-चार दिवसांपासून उघडीप दिल्यामुळे कामडी यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने मळणी केली.मळणीअंती त्यांना काळे व मातीमिश्रित दीड क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले. हे सोयाबीन बाजारात कोणत्या दराने विकल्या जाईल, हेही सांगणे कठीण आहे. यामुळे शेतीत नफा तर सोडाच; मुद्दलही निघाले नाही. आधी कोरोना, नंतर अतिपावसाने शेतपिकांचे नुकसान झाले. यामुळे कामडींसह परिसरातील शेतकऱ्यांची सोयाबीनची शेती तोट्याची ठरली. हवालदिल शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.सततच्या पावसाचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. जामनी गावात प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची हीच स्थिती आहे. लागवड खर्चही निघाला नसल्याने पुढील अर्थचक्र कसे चालवावे, ही गंभीर समस्या उभी ठाकली आहे. शासनाने भरीव मदत करावी.- सुरेश कामडी, शेतकरी, जामनी (चिकणी).

टॅग्स :agricultureशेती