शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला फुटले कोंब; तालुक्यातील शेतकरी मारतोय बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे.

सुरेंद्र डाफलोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सततच्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांच्या एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. उसंत घेत सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला आहे. सध्या उभ्या सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने मायबाप सरकार हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता का हो, अशी बोंब मारत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मागील १५ दिवसांपासून तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. नदी व नाल्यांच्या काठावरील काही शेतकऱ्यांचे उभे पीक पुरामुळे वाहून गेले, तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जलमय झाले आहे. याचाच विपरित परिणाम सध्या उभ्या पिकांवर झाला असून, आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडलातील १ हजार ८११ शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टरवरील उभ्या पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची नोंद तालुका प्रशासनाने घेतली आहे. नुकसान झालेल्या उभ्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे.सध्या शेतकरी सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत असले तरी ढगाळ वातावरण तसेच उसंत घेत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या  शेंगानाच कोंब फुटले आहेत. एकूणच तालुक्यातील शिरपूर, जळगाव, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, वर्धमनरी, मांडला, निंबोली (शेंडे), राजापूर, कर्माबाद, अहिरवाडा, खुबगाव, पाचेगाव, बोरगाव, दहेगाव (मु.) आदी गावांमधील उभ्या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. शासन नुकसान भरपाई देते काय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

उत्पादनात येणार घट- सततच्या पावसाचा आर्वी तालुक्यातील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांना सध्या कोंब फुटले असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयबीनच्या  शेंगांना कोंब फुटले असून, शासनाने नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादकांना भरपाई द्यावी.- भास्कर चौकोने, शेतकरी, दहेगाव (मु.).

पावसामुळे तालुक्यातील किती हेक्टरवरील उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले, याचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन, तूर व कापूस पिकाला बसला आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- एस. व्ही. वायवळ,  तालुका कृषी अधिकारी, आर्वी. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती