शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे३० टक्के बियाण्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्ग चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात जिल्ह्यात ढगाळी वातावरण होते. शिवाय अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. याच संभाव्य पावसादरम्यान पेरणीची कामे पूर्ण करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी बियाण्यांची ३० टक्के खरेदी केली. परंतु, पाऊसच बेपता झाल्याने शेतकरी चातकासाखरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पाऊस लांबल्यास यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.वर्धा जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कपाशीचे उत्पादन प्रामुख्याने घेतली जातात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात विविध बियाणे कृषी विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. ५८ हजार ७०० क्विंटल सोयाबीन, १३ लाख ७१ हजार ५०० पाकीट कपाशी तर ३ हजार ५४२ क्विंटल तुरीचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहेत. सध्या स्थितीत त्यापैकी २२ हजार ५०० क्विंटल सोयाबीन, ३ लाख १० हजार पाकीट कपाशी तर ७५० क्विंटल तुरीचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करणार आहेत.५.२५ टक्केच शेतकऱ्यांना मिळाले पीककर्जखरीप हंगाम तोंडावर आहे. परंतु, अद्यापही अनेक बँकांनी पीककर्जाची प्रकरणे निकाली काढलेली नसल्याचे वास्तव आहे. सध्यास्थितीत ४ हजार ५५८ शेतकºयांना पीककर्ज म्हणून ५४ कोटी रुपये बँकांनी दिले असून त्याची टक्केवारी केवळ ५.२५ असल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असे बोलले जात असल्याने बँकांनीही वेळीच पीककर्जाची प्रकरणे निकाली काढणे गरजेचे आहे.तीन तालुक्यांत सोयाबीन बियाण्यांची सर्वाधिक विक्रीजिल्ह्याला प्राप्त बियाण्यांच्या साठ्यापैकी आतापर्यंत सुमारे ३० टक्के सोयाबीन, २२ टक्के कापूस व २५ टक्के तुरीचे बियाणे विक्री झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी वर्धा, समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात सध्यास्थितीत सर्वाधिक सोयाबीनचे बियाणे विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती