सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:15+5:30

सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

Sowed soybean seeds; But it did not grow | सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

Next
ठळक मुद्देसेलू तालुक्यातील २७ शेतकऱ्यांनी नोंदविली तक्रार : कृषी विभागाच्या पथकाने भेट देत केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : मृग नक्षत्रात पेरणीयोग्य झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली; मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतात बीज अंकुरलेच नसल्याने खरेदी केलेल्या बियाण्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर कृषी विभागाच्या चमूने २७ शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत पंचनामा केला. यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.
सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.
त्यातील काही शेतकऱ्यांनी कंपन्यांशी जुळवूून घेत बियाणे घेऊन समाधान मानले, तर काहींनी तक्रारी केल्या. त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील शास्त्रज्ञ उंबरकर, तालुका कृषी अधिकारी राधिका बैरागी, मंडळ कृषी अधिकारी ढेंधरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुरारकर, चव्हाण, पर्यवेक्षक दांडेकर, सहाय्यक पांडे आदींनी कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यात आकोली येथील विशाल गोमासे, तर घोराड येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बोळवण
सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुन्हा मोफत बियाणे पुरवून शेतकºयांची बोळवण करण्याचा प्रकार सुरू आहे मात्र, बियाणे प्रमाणित करणारी टीम याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दखल घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही व पथकाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसा अहवाल तयार केला. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.

बोगस बियाण्यांमुळे आर्थिक फटका
आंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन नामदेव कडू यांनी १० बॅग महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, बराच काळ लोटूनही बियाणे न उगवलेच नाही. यासंदर्भात कडू यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. नुकसानभरपाई देण्यासह बियाणे पास करणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Sowed soybean seeds; But it did not grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी