शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ५०० गारपीटग्रस्तांची वीज देयके माफ

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात

रूपेश मस्के - कारंजा (घा़)

 राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्‍यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सुट देण्यात येणार आहे़ याचा लाभ तालुक्यातील ३ हजार ५०० गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार आहे़ त्यांची जानेवारी ते जून २०१४ ची वीज देयके महावितरणला राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येणार आहे़ राज्यात फेब्रुवारी-मार्च २०१४ या कालावधीत गारपीट व अवकाळी पाऊस झाला़ यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली़ या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ यात बाधित झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विशेष पॅकेज देण्यात येणार आहे़ कारंजा तालुक्यातील गहु ७४२ हेक्टर, चना ७१७ हेक्टर, संत्रा, मोसंबी २३३ हेक्टर, व इतर ७० हेक्टर असे एकूण १ हजार ७६५ हेक्टरचे ३ हजार ५०० शेतकरी नुकसानग्रस्त आहेत़ त्यांच्या याद्या विद्युत वितरण विभागाने कृषी अधिकारी कारंजा यांना मागितल्या असून ज्या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत आहे, अशांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून बाधित शेतकर्‍यांची अधिकृत माहिती घेऊन अमंलबजावणी करण्याचे आदेशित केले आहे. यानुसार कृषी पंपधारक गारपीटीने बाधित यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांचे वीज देयके माफ होणार आहे. शेतकर्‍यांच्या बाधित यादीतील नाव, वीज क्रमांक, जानेवारी ते मार्च वीज बिलाची रक्कम व एप्रिल ते जून बिलाची रक्कम अशी माहिती पुरवायची आहे. नापिकी व कर्जबाजारी, अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.