शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.

ठळक मुद्देनागरिकांची आर्त हाक : पाच दिवसांआड होतो पाणीपुरवठा; गृहिणींची होतेय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : तालुका व विशेषतः शहर पाणी समस्येसाठी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे.१९९८ मध्ये कार नदीवर धरण बांधण्यात आले. पाण्याची समस्या कायम सुटेल असा, आशावाद कारंजावासीयांना वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आल्या आणि गेली. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या काळात खैरी धरण येथून जलवाहिनीद्वारे कारंजा शहरामध्ये व तालुक्यात नारा २२ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती पाईपलाईन इतकी सदोष होती की वारंवार त्या पाईपलाईन मध्ये समस्या निर्माण होऊन जलसंकट गडद होत होते. आजही कारंजा शहराला कधी ५ तर कधी सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. जलवाहिनी फुटली फुटली आठ दिवसपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची लक्ष नाही. त्यांची अनास्था कायम आहे.नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे मतदार काँग्रेस व भाजपा या दोन्ही राजकीय पुढाऱ्यांना ठासून सांगणार आहेत.वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे खैरी धरणावरून जलशुद्धीकरण करून कारंजा शहरात पाणी आणण्यात येईल येईल व दररोज शहरवासीयांना पाणीपुरवठा कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.-दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा.कारंजा शहराचा पाणीप्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला असून केवळ मंजुरीसाठी अडकलेला आहे. त्यासाठी माजी आमदार अमर काळे व पालकमंत्री सुनील केदार तयारीला लागलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा पाणीपुरवठा मंजुरीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.-कल्पना मस्की, नगराध्यक्ष, नगरपंचायत, कारंजा.

टॅग्स :Waterपाणी