शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत खातेधारकाकडून सोशल डिस्टन्सिंगला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

बँकेतील खातेधारकांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लाबलचक रांगा पहावयास मिळत आहे. बँक व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका संभावण्याची भीती आहे.

ठळक मुद्देरोज लागतात रांगा : ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन, आजाराचा बळावतोय धोका

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाचा बँकेतील खातेधारकांकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बँकेसमोर पहावयास मिळत आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लाबलचक रांगा पहावयास मिळत आहे. बँक व्यवस्थापनाकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आरोग्याला धोका संभावण्याची भीती आहे.आर्वी शहरातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक कृषी शाखा आदी बँकेत ग्राहकांची सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून येते. याठिकाणी स्वयंसेवक, पोलीस किंवा गृहरक्षकांची कमतरता जाणवत आहे. गर्दी टाळणे हाच कोराना आजारासाठी उपाय असून याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याने या गर्दीतून आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकरता येत नाही.आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारला बँका उघडण्यापूर्वीच बँकांसमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. बँक सुरु होताच ग्राहकांनी बँकांमध्ये एकच गर्दी केली त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी उपाययोजना केली असूनही प्रशासनाचे सर्व नियम, जमावबंदी, कोरोना संबंधीचे सर्व नियम, धाब्यावर बसून नागरिक गर्दी करीत आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाचे निर्देश नागरिकांकडून पाळणे अत्यंत गरजेचे आहे परंतु, नागरिकांच्या असहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने सक्तीचे पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या