शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या तडाख्याने मजुरांचे हाल

By admin | Updated: May 1, 2015 01:43 IST

दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत.

तळेगाव (श्या.पं.) : दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत. पोटासाठी श्रमाची कामे करण्यास बाध्य असलेल्या मजुरांचे उन्हामुळे हाल होत आहेत. वातावरणात होत असलेला बदल हा आरोग्यासाठी हानिकारक ठरला आहे. यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना मजूर वर्गातून वाढत्या उष्म्यामुळे नकार देण्यात येत असल्याची स्थिती आहे.कधी ऊन तर कशी पाऊस, आभाळ अशी स्थिती असल्याने वातावरणाचा समतोल बिघडला आहे. एकाएकी उन्हाचा पारा वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पोटासाठी उन्हातान्हात काम करणे गरजेचे असल्याने मजुरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अधिक पाणी पिणे, पाढऱ्या रंगाचे कपडे घालणे आवश्यक आहे. उन्हात जाताना डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधल्याने उन्हापासून बचाव करू शकतो. उन चांगलेच कडाडल्याने ग्रामस्थ शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत असल्याचे चित्र आहे. तळेगाव परिसरात अजूनही कपाशी वेचणीसाठी मजूर शेतात जात आहेत. मात्र सकाळी ८ ते दुपारी १ या वेळातच शेतात मजूर काम करताना दिसतात. कडाडलेल्या उन्हामुळे मजुरांना आजार जडत असून परिणामी रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागात रस्ते ओस पडत आहे.(वार्ताहर)