शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्राला जलपर्णीसह झुडपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. याची दखल घेत एक वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळातून नागरी सुविधेंतर्गत तीन लाख रुपये खर्चून नदीपात्रालवर गावाच्या मध्यभागी घाट बांधण्यात आला.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये रोषाचे वातावरण । लाखो रुपये खचूर्नही साफसफाईकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : येथील गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रावर वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून घाट बांधण्यात आला. मात्र, सध्या नदीपात्राला जलपर्णीसह झाडा-झुडपांनी वेढले असून सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. साफसफाई करण्याकडे मात्र, कुणाचेही लक्ष नसल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण आहे. घाट परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांचे धार्मिक सण व्रत वैकल्याला सुरुवात होते. गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नदीपात्रात गावातील महिला हरितालीकेला गौरी पूजन तसेच विसर्जन करतात. तसेच नागरिकही घरगुती गणपतीचे विसर्जन व धार्मिक विधी या नदीपात्रावर करतात. याची दखल घेत एक वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळातून नागरी सुविधेंतर्गत तीन लाख रुपये खर्चून नदीपात्रालवर गावाच्या मध्यभागी घाट बांधण्यात आला. विविध धार्मिक कार्य या घाटावर करता येणार असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, सध्याची स्थिती बघता अर्धे नदीपात्र गाळाने बुजले आहे. नदीपात्राला जलपर्णी आणि झुडपांनी वेढले आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे नदीघाटावर पाय ठेवण्यासही कुणी तयार नाही. लाखो रुपये र्खचून बांधलेल्या घाटावर कोणतेच धार्मिक विधी तसेच गणपती विसर्जन करता येत नसल्याने गावातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.ग्रा.पं.चे दुर्लक्ष कारणीभूतमागील अनेक वर्षांपासून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आलेली नाही. तसेच बुजलेल्या पात्रातील गाळही काढण्यात आला नाही. मागीलवर्षी घाटाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, येथील स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, हे समजायला मार्ग नाही. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षानेच नदीघाटाची ही अवस्था झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :riverनदी