शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांनंतर उघडली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलै पासून संचारबंदी लागू करुन सर्व व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती केली होती.

ठळक मुद्देअ‍ॅन्टीजेन टेस्टची सक्ती नाही : चर्चेअंती व्यावसायिकांनी घेतला संप मागे

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : ताप, सर्दी, खोकला, घशाचा त्रास होणे आदी लक्षणे आढळून आल्यास त्यांनीच कोविड तपासणी करावी, कोणत्याही व्यावसायिकावर कोविड चाचणीची सक्ती करण्यात येणार नाही, अशी चर्चा माजी आमदार अमर काळे यांच्यासोबत झाल्यानंतर व्यावसायिकांनी बेमुदत संप मागे घेऊन तब्बल सात दिवसांनंतर दुकाने उघडली.बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलै पासून संचारबंदी लागू करुन सर्व व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती केली होती. या आदेशाविरोधात व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या आदेशाविरोधात व्यावसायिकांनी बेमुदत संप पुकारला होता. व्यावसायिकांची परवड आणि नागरिकांची परिस्थिती बघता माजी आमदार काळे यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून पालकमंत्र्यांशी व्यावसायिकांची चर्चा घडवून आणली.चर्चेदरम्यान लक्षणे आढळून आले तरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी, अन्यथा सक्ती नको, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शनिवारी सायंकाळी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक चर्चेअंती यावर तोडगा निघाल्याने व्यावसायिकांनी बेमुदत संप मागे घेतला. बैठकीला व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ व्यावसायिक धनपतलाल टावरी, श्यामसुंदर राठी, नानू साखरे, श्रीकांत कर्मकर, हातीम भाई, रमेश सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ सुवर्णकार ज्ञानचंद् संकलेचा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :Marketबाजार