शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपासून १७ ट्रॅक्टर पासिंगविना

By admin | Updated: June 6, 2014 00:07 IST

मागासर्गीय महिला बचत गटासाठी असलेल्या योजनेंतर्गत समाजकल्याणच्या वतीने १७ बचत गटांना ट्रॅक्टर देण्यात आले. परंतु सात महिन्यांपासून हे ट्रॅक्टर पासिंग करण्यात आलेले नाही.

समाजकल्याण व परिवहनचे दुर्लक्ष : बचत गटाने केला ट्रॅक्टर जमावर्धा : मागासर्गीय महिला बचत गटासाठी असलेल्या योजनेंतर्गत समाजकल्याणच्या वतीने १७ बचत गटांना ट्रॅक्टर देण्यात आले. परंतु सात महिन्यांपासून हे ट्रॅक्टर पासिंग करण्यात आलेले नाही. शेवटी पुलफैल येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने मिळालेला ट्रॅक्टर समाजकल्याणमध्ये परत केला आणि लवकरात लवकर तो पासिंग करण्याची मागणी सहायक आयुक्त जया राऊत यांना निवेदनाद्वारे केली. तसेच ट्रॅक्टरची चावीही परत केली. राज्यातील मागासवर्गीय महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीकरिता राज्यशासनाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात. याच योजनेंतर्गत शासनाद्वारे महिला बचत गटांना ट्रॅक्टर देण्याची योजना आहे. यांतर्गत  जिल्ह्यातील पुलफैल येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटासह अन्य १६ बचत गटांना डिसेंबर २0१३ ला ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. पण सात महिन्यापासून यातील एकाही ट्रॅक्टरची परिवहन विभागाच्या वतीने पासिंग करण्यात आलेली नाही. तसेच ट्रॅक्टरचे वाटप करताना अनेक सामानाची कमतरता असल्याचेही बचत गटाच्या सर्व सदस्यांनी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त, वर्धा यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत त्याची शहनिशा केली नसल्याचा आरोप निवेदनात सावित्रीबाई फुले बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी केला आहे.  शासनाच्या धोरणानुसार ट्रॅक्टरचे पासिंग करण्याबाबत अनेकदा सहाय्यक आयुकत समाज कल्याण, वर्धा यांना सहकार्य करण्याबाबत लेखी व मौखिक कळविण्यात आले. परंतु त्याची कोणतीही मानसिकता नसल्यामुळे बचत गटाकडे किंवा ट्रॅक्टर वाटप झाल्यानंतर त्याच्या पासिंगचे काय याकडे लक्ष देण्यात आले नसल्याचेही निवेदनात मनूद आहे. ट्रॅक्टरची पासिंग न झाल्यामुळे कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे सदर ट्रॅक्टर एकाच जागेवर खराब होत असल्याने सावित्रीबाई फुले बचत गटाच्या अध्यक्षा शारदा झांबरे यांनी सदर ट्रॅक्टर समाजकल्याण विभागात जमा केला आणि चावीही त्यांना रितसर परत केली. तसेच जोपर्यंत पासिंग होत नाही तोपर्यंत तो परत नेणार नाही अशी भूमिकाही घेतली.  यासंदर्भात सहायक आयुक्त यांना विचारणा केली असता आमच्या कडून ट्रॅक्टर पासिंगसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले पण परिवहनचे अधिकारी आपल्याशी उद्धट वागत असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. आर मांजरीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नो रिस्पॉन्स मिळत होता. (शहर प्रतिनिधी)