शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तातही पवनार नदी परिसरात पार्ट्या रंगल्याच

By admin | Updated: January 3, 2016 02:43 IST

वर्षाचा शेवटचा दिवस ‘थर्टी फस्ट’ म्हणून साजरा करण्याचे फॅड शहरात सगळीकडेच फोफावू लागले आहे. यासाठी एकांत परिसर म्हणून पवनार येथील नदीपात्राला सर्वांची पसंती असते.

प्लास्टिकचे ग्लासेस व पाणीपाऊचचा खच : धाम नदीपात्राचे पावित्र्य धोक्यातवर्धा : वर्षाचा शेवटचा दिवस ‘थर्टी फस्ट’ म्हणून साजरा करण्याचे फॅड शहरात सगळीकडेच फोफावू लागले आहे. यासाठी एकांत परिसर म्हणून पवनार येथील नदीपात्राला सर्वांची पसंती असते. यंदा पोलिसांचा पवनार परिसरात तगडा बंदोबस्त होता. असे असतानाही नदीपात्रात सर्वत्र प्लास्टिक ग्लासेस, दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक पाऊच पाहता थर्टी फस्ट नाही तर ‘हॅपी न्यू इयर’ म्हणत येथे पार्ट्या झडल्याचे निदर्शनास येत आहे. मद्यपींसाठी पवनार येथील धाम नदीचे पात्र ही आवडती जागा आहे. दारूबंदी असतानाही येथे विनोबांच्याच समाधी स्थळाजवळ वर्षभर दारूचे दर्दी आपली गर्दी करतात. महत्प्रयासाने गावात पोलीस चौकी निर्माण झाली, पण याचा मद्यपींवर कुठलाही वचक बसला नसल्याचे दिसते. सायंकाळ होतात नदीच्या दोन्ही काठावर मद्यपींचा हैदोस असतो. ३१ डिसेंबरलाही येथे पार्ट्या झडणार हे गृहित धरून अनुचित प्रकार टाळण्याकरिता सेवाग्राम पोलिसांनी येथे तगडा बंदोबस्त ठेवला होता. परिणामी काही दिवस तरी येथे मद्यपी झिंगणार नाही असा समज होता. हा समज मोडीत काढत थर्टी फस्ट नाही तर नव्या वर्षाचे स्वागत करीत नववर्र्षाच्या पहिल्या दिवशी येथे पार्र्ट्या झडल्याच्या ताज्या खाणाखुणा पहावयास मिळतात. सर्वत्र प्लास्टिकचे ग्लासेस आणि त्यात उरलेली थोडीशी दारू आत्ताच हा प्रकार घडल्याचे सांगते. त्यामुळे केवळ एक दिवस बंदोबस्त ठेवण्याचा फायदा काय असा प्रश्न येथे फिरावयास येणारे नागरिक व्यक्त करतात. मद्यपींमुळे येथील पात्र दूषित होत आहे. दर रविवारी येथे होणारे स्वच्छता अभियान सध्या बासणात गुंडाळले आहे. ग्रामपंचायतचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.(शहर प्रतिनिधी)