शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या तक्रारीचा आठवड्यात निपटारा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली काढण्यास सांगितले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे । दुसऱ्या जनसंवाद कार्यक्रमात तक्रारीचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बेघरांना घरकुलासाठी पट्टेवाटप, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन, रोजगार यासह विविध समस्यांचे शेकडो अर्ज शनिवारी पालकमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुसºया जनतासंवाद कार्यक्रमात प्राप्त झाले. नागरिकांनी आपल्या समस्या मांडून न्याय देण्याची मागणी केली. यावेळी नियमानुसार प्रत्येक अर्जावर आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सुमारे तीन तासापर्यंत पालकमंत्र्यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. यावेळी आमदार डॉ.पंकज भोयर यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक भीमनवार आणि सर्व विभागातील प्रमुख अधिकाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेले सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले. ज्या समस्या स्थानिक पातळीवर सुटणार नाही व धोरणात्मक विषयांचे अर्ज मुंबई येथे पाठवून त्या समस्यांवर मुंबईत बैठक घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली काढण्यास सांगितले. मोहता मिलमधील अनेक कामगारांचे हजेरी पट ठेवले जात नाहीत. तसेच कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात येते, अशी तक्रार मोहता मिलच्या कामगारांनी दिली. याबाबत माहिती घेऊन तोडगा काढण्याची हमी त्यांनी दिली.सामान्य रुग्णालयात शल्यचिकित्सक यांनी २६ ला बैठक घ्यावी. तसेच दिव्यांगांना प्राथमिकतेने सुविधा देण्याबाबत सांगितले. आलेल्या अर्जावर आठ दिवसात कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारदाराला लेखी कळवावी. एखाद्याचे काम नियमात बसत नसेल तर तेही लेखी कळवून अर्ज निकाली काढावा, अशा सूचनाही पालकमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित सर्व अधिकाºयांना दिल्या आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेministerमंत्री