शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी करून पेरा करा

By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती

एक लक्ष क्विंटल बियाणे : गायकवाड यांचा शेतकर्‍यांना सल्लावर्धा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी दिली.बियाणे उपलब्ध होण्यापूर्वी बियाण्याचे कंपनीमार्फत उगवण क्षमतेची चाचणी केल्या जाते व चाचणीमध्ये प्रमाणित झाल्यानंतरच सदर बियाणे विक्रीकरिता उपलब्ध होते.; परंतु आपल्याकडे घरचे बियाणे उपलब्ध नसल्यास कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले सोयाबीचे बियाणे खरेदी करावे; परंतु सदर बियाणे वाहतुकीमुळे व इतर कारणाने हाताळतांना उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विकत घेतलेल्या बियाण्याची सुद्धा उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रीया करून सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून  कृषी विस्तार अधिकार्‍यांनी पत्रकातून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेकर्‍यांचे नुकसान होवू नये म्हणून सुरू वर्षी सोयाबीनची पेरणी करतांना सोयाबीन पिकामध्ये शेतकर्‍यांनी सहा ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे एकतरी पीक शेतकर्‍यांच्या हाती लागेल असे कृषी विभागाचे म्हणने आहे.(प्रतिनिधी)सोयाबीन पेरतांना घ्यावयाची काळजी शेकर्‍यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याचा वापर पेरणीकरिता करावा. त्यामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन  बियाणे खरेदीवरील खर्च कमी होईल. सोयाबीनमधील सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्येक वर्षी बदल करण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येतात; परंतु घरच्या बियाण्याची पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज सुद्धा काढता येतो.