शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सतीश नरहरशेट्टीवारची रवानगी न्यायालयीन कोठडीत

By admin | Updated: December 25, 2016 02:17 IST

येथील भू-माफिया सतीश नरहरशेट्टीवार याची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले

रविवारी सेलू पोलिसांना ताबा : इतर ठाण्यांकडूनही मागणी वर्धा : येथील भू-माफिया सतीश नरहरशेट्टीवार याची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी सात दिवसांकरिता न्यायालयातील कोठडीत केली आहे. नरहरशेट्टीवार विरोधात गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांनी त्याच्या ताब्याची मागणी केली असल्याने उद्या रविवारी त्याला सेलू पोलिसांच्या स्वाधीन करावे, असा निर्णय झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. बनावट एनए व बनावट विक्रीपत्राच्या आधारे सर्वसामान्यांना तर एकाच जमिनीच्या कागदावर चार बँकांतून कर्जाची उचल करणाऱ्या सतीश नरहरशेट्टीवारला सावंगी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश नरहरशेट्टीवार याच्यावर केवळ सावंगी नाही तर सेलू, खरांगणा, वाशिम व अकोला ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. या पोलिसांकडून न्यायालयात त्याचा ताबा मागण्यात आला होता. त्यावर वर्धा न्यायालयाने निर्णय घेतला असून त्याला रविवारी सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वर्धेनंतर येथील गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या नागपूर स्थित घराची झडती घेतली असता येथूनही मोठ्या प्रमाणात बनावट एनए जप्त करण्यात आले. या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या गोरखनाथ चौधरी याच्या घरातही बनावट एनए मिळून आले आहे. या प्रकरणात आवश्यक असलेले कागदपत्र हाती आल्याने आता नरहरशेट्टीवार याचा ताबा नसला तरी प्रकरणात न्यायसिद्धी होण्यास मदत होईल, असे ठाणेदारांनी सांगितेले.(प्रतिनिधी)