शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या नावावर बाजारात लूट

By admin | Updated: June 10, 2016 02:04 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

बळीराजावर आघात : सोयाबीन ४०० तर तुरीच्या बियाण्यांकरिता २०० रुपयांची जादा मागणी वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. यात शेतकरी महाबिजच्या बियाण्यांची मागणी करण्याकरिता गेले असता बाजारात त्यांना जादा पैशाची मागणी करण्यात येत असल्याची ओरड आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची दरवाढ केल्याचे त्यांना सांगितले जात आहे. मात्र महाबिजकडून कुठलीही दरवाढ झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत असताना जिल्ह्यात त्याची लूट होत असल्याचे दिसून आले आहे.महाबीज कंपनीच्या बियाण्यांच्या नावावर होत असलेल्या लुटीचे बळी जिल्ह्यातील शेतकरी ठरत आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी महाबिजच्यावतीने किंवा कृषी विभागाच्यावतीने करून जिल्ह्यातील अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबविण्याकरिता शासनाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात यंदाच्या खरीपात सुमारे ४ लाख हेक्टरवर पेऱ्याचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन व तुरीचा पेरा वाढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे नियोजन आजच्या स्थितीत जिल्ह्यात खरे ठरत आहे. बाजारात शेतकरी सोयाबीन व तुरीचे बियाणे खरेदी करण्याकरिता जात आहेत. त्यांच्याकडून कृषी केंद्र संचालकाला महाबिजचे सोयाबीन किंवा तुरीची मागणी करण्यात आल्यास त्यांना महाबिजने बियाण्यांचे दर वाढविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून सोयाबीनच्या विविध वाणाच्या एका ३० किलो बॅगच्या मागे सरासरी ४०० रुपये जादा घेण्यात येत आहे. तर तुरीच्या दोन किलोच्या बॅगच्यामागे सरासरी २०० रुपये जादा घेण्यात येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. ही वाढ केवळ तूर व सोयाबीनच्या बियाण्यांवरच नाही तर मुंग उडद व इतर बियाण्यांवर असल्याचीही ओरड आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर झालेली बियाण्यांची दरवाढ व त्यात मदत म्हणून वाढलेले खतांचे दर यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. याचा विचार शासनाने करून यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अनेक कृषी केंद्रसंचालकांकडे महाबिजच्या बियाण्यांचा जुना स्टॉक आहे. मात्र त्यांच्याकडून तो विकण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. महाबिजच्या बियाण्यांची मागणी वाढल्यास त्याचा काळा बाजार करण्याची त्याची तयारी असावी अशी चर्चा बाजारात आहे. महाबिजचे बियाणे महागल्याचे सांगत अनेकांकडून दुसऱ्या कंपनीचे बियाणे विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यात अव्वाच्या सव्वा दर लावून ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदानावरील आहे. शिवाय जिल्ह्यात मागणीनुसार पुरवठा झाला आहे. यात कोणी काळाबाजार करीत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. - एन.पी. खांडेकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज