शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३६ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत करा

By admin | Updated: May 23, 2015 02:26 IST

सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते.

वर्धा : सेवाग्राम कस्तुरबा हेल्थ सोसायटीत कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना १ मे २०१५ पूर्वी व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले होते. रुग्णालय व परिसरात हे कर्मचारी १५ ते २० वर्षांपासून कार्यरत होते. कामावरुन कमी करताना व्यवस्थापनाने या कर्मचाऱ्यांना १ मे पासून अटेन्डन या पदावर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २० दिवसांचा कालावधी उलटुनही अद्याप कामावर पूर्ववत केले नाही. केवळ पाच कर्मचाऱ्यांना रुजु करुन घेतले. यामुळे ३६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून कामावर पूर्ववत करण्याची मागणी आहे.याबाबत कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, खा. रामदास तडस, तहसीलदार वर्धा यांना देण्यात आली आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करताना पूर्ववत करण्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. याकरिता कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेचे कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे मागितले होते. त्यानुसार व्यवस्थापनाकडे कागदपत्र सादर करण्यात आले. त्यानंतर कामावरुन कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. यात अटेन्डन या पदाकरिता काम करण्यास तयार आहात काय, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला सदर पदावर काम करण्यासाठी होकार दिला होता. यानंतर व्यवस्थापनाने १ मे २०१५ पासून अटेन्डन या पदावर बाय आॅर्डर रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले होते. याला २० दिवसांचा कालावधी लोटला. पण अजूनही कामावर पूर्ववत करण्यात आले नाही. यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)