शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेच्या दूताला आदरांजली

By admin | Updated: October 3, 2016 00:38 IST

येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली.

सेवाग्राम आश्रमात पर्यटकांची गर्दी : सायंकाळपर्यंत ३३ हजार मीटर सूत कताईसेवाग्राम : येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात रविवारी भरगच्च कार्यक्रमांनी शांती दूताला आदरांजली अर्पण करण्यात आली. पहाटे सामूहिक प्रार्थनेने सुरू झालेल्या कार्यक्रमात दिवसभर सूतकताई, अतिथींचे मार्गदर्शन व शासनाच्या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. सकाळपासून राबविण्यात आलेल्या सूतकताई यज्ञात सायंकाळपर्यंत ३३ हजार मिटर सूत कातण्यात आले. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १४७ व्या जयंतीदिनी आश्रमात एका विशेष कार्र्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंबर चौधरी यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून खा. रामदास तडस, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, गांधी विचार परिषदचे डॉ. भरत महोदय, आश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा. म. गडकरी उपस्थित होते. मान्यवरांचे सूतमाळेने स्वागत करून डॉ. अनिल काकोडकर व डॉ. विश्वंबर चौधरी यांना खादीची शाल, पुस्तक व चरखा भेट देण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले, गांधी आश्रमात आल्यानंतर नवीन काही तरी मिळते. तीन वर्षानंतर गांधीजींच्या १५० व्या जयंतीला आपण सामोरे जाणार आहो. देशभर नवीन कार्यक्रम, उपक्रम आणि यातून जनजागृती होण्यासह देशातील समस्यांची उकल करण्यासाठी गांधी विचारांचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याच ठिकाणावरून सबंध देशाला जागृत करून स्वातंत्र्य चळवळ गांधीजींची प्रभावशाली केली. यामुळे गांधीजींची विचारसरणी आणि शांतीच्या मार्गानेच देशातील प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणातून डॉ. विश्वंबर चौधरी यांनी महात्मा गांधी यांनी जसा विकासात शेवटच्या व्यक्तीचा विचार केला तसाच शासनाने करावा असे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. आभार भरत महोदय यांनी मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ वैष्णव जन तो या भजनाने झाला. बापू कुटी सेवाग्राम आश्रम भाग १ ते २ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित संपूर्ण कार्यक्रमात आश्रमाचे अधीक्षक भावेश चव्हाण, अशोक गिरी, बाबा खैरकार, शंकर बगाडे, गजानन अंबुलकर, नामदेव ढोले, सुधाकर झाडे, सागर कोल्हे, अरूण लेले, भैय्या मशानकर, प्रदीप उगले, ज्ञानेश्वर रेंगे, अनिल देवतळे, नामदेव पाटील, जालंधर नाथ, अतुल शर्मा, हनुमान पिसुर्डे, सुचित्रा झाडे, संगिता चव्हाण, बघेल, माधुरी भोंगे, प्रभू शहाणे, भावना डगवार, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, सिद्धेश्वर कंबरकर, सचिन हुडे इत्यादीसह शाळा महाविद्यालय विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी केली चरख्यांची पाहणीगांधी जयंतीदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात हजेरी लावली. प्रार्थना करीत बापूंना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या उपस्थितीत नई तालीम परिसरात सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवाचा समारोप करण्यात आला. प्रार्थनेच्यावेळी ना. मुनगंटीवार यांच्यासह हिंगणघाट - समुद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व आश्रमातील साधकांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आश्रमात सुरू असलेल्या कताईदरम्यान चरख्यांची माहिती घेतली.