शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-तुळजापूर व बुटीबोरी-वर्धा रस्त्यांची दुरूस्ती करा

By admin | Updated: October 6, 2016 00:41 IST

नागपूर, बोरी, तुळजापूर आणि बुटीबोरी ते वर्धा या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

सोशल फोरमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेवर्धा : नागपूर, बोरी, तुळजापूर आणि बुटीबोरी ते वर्धा या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. बुटीबोरी ते वर्धा मार्गावर २२/० ते ७७/२०० किमी या दरम्यान रस्ता खड्ड्यातच गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी वर्धा सोशल फोरमद्वारे करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.बुटीबोरी ते वर्धा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रस्त्याने वाहन चालविताना समोरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत आहेत. वर्धा ते बुटीबोरी प्रवास करीत असताना माणसाच्या शरीराच्या हाडांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे. अनेकांना मनक्याचे व पाठीचे आजार अडले आहेत. त्याचप्रमाणे गाड्यांची व टायरची झीज होत आहे. या सर्व बाबीला जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. याच रस्त्याचे ७४ किमीपर्यंत डांबरीकरण १४ वर्षांपूर्वी झाले होते; पण सरफेस अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याचाच अर्थ रस्ता हा वाहतुकीने खराब होत नाही तर डांबरीकरण करताना कमी डांबर वापरल्याने खराब होतो, हे निश्चित. खड्डेही डांबराने योग्यरित्या भरल्या जात नाही. पॅचेस वारंवार उखडतात. यामुळे पॅचेस योग्य करावे, रस्त्याचे साईडबर्म अनेक ठिकाणी दबलेले आहे, त्यामुळे अपघात होतो, ते भरण्यात यावे आदी मागण्या करण्यात आला. निवेदन देताना वर्धा सोशल फोरमचे सचिव अविनाश सातव, सदस्य प्रदीप बजाज, रवींद्र कडू, सुभाष पाटनकर, अविनाश सेलूकर, पवन बोधनकर व इतर सदस्य उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)