शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या समस्या निकाली काढा

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवसानिमित्त जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी संघटनेच्या उपाध्यक्ष

वर्धा : महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवसानिमित्त जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी संघटनेच्या उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
निवेदनातून सबसिडीच्या नावावर होणारी जनतेची लूट थांबवावी, जुन्याच पद्धतीने सिलिंडर कमी भावात द्यावे, धान्य माफक दरात द्यावे, रॉकेलचा काळाबाजार थांबवावा, प्रत्येकाला शिधापत्रिका द्याव्या, दारूविक्री बंद करावी, निराधारांचे बंद झालेले पगार तत्काळ द्यावे, विधवा परित्यक्ता, एकल महिलांना बीपीएल कार्ड द्यावे, महिलांना संरक्षण देऊन चौकशी करण्याकरिता महिला अधिकारी नेमून वेगळा कक्ष स्थापन करावा, मानव अधिकार कायद्यात सुधारणा करून आनंदी, निर्भय व स्वतंत्रपणे जीवन जगता यावे, याकरिता दुरूस्ती करावी, अंधश्रद्धा, बुवाबाजी, नरबळी करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला मदत द्यावी, १९९५ पासून वास्तव्य ज्या जागेवर आहे त्यांना घराचे पट्टे द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली.
जनसामान्यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात निर्मल वाघ, रमाबाई चाटे, मंगला पारलेवार, बेबी खोडतकर, नलू चाफले, उमा वैद्य, अनुसया झाडे, दुर्गा काकडे, कुंदा घंगारे, गीता ठाकूर, नजमा पठाण उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)