शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावात रास्तो रोको आंदोलन

By admin | Updated: October 30, 2014 22:57 IST

अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात जवरखेड खालसा येथे २१ आॅक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडाचा बसपाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला़ बसपाने मोर्चा काढून रास्ता रोको

पुलगाव : अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात जवरखेड खालसा येथे २१ आॅक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडाचा बसपाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला़ बसपाने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलनही केले़ यानंतर नायब तहसीलदार गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पाली यांना निवेदन सादर करून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली़ खालसा येथील दलित कुटुंबातील संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) या तिघांची समाजकंटक व मानसिक विकृतीच्या इसमांनी हल्ला करून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीने बुधवारी मोर्चा काढला़ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यानंतर सुमारे एक हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला अटक करून घेतली़ नायब तहसीलदार गायकवाड, डीवायएसपी पाली, पीएसआय पाटील यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविण्यात आला़ उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजू लोहकरे यांनी आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. दलितांवरील अन्याय, अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते़ या घटनेला बरेच दिवस लोटले असताना आरोपी अद्याप मोकाटच फिरत आहेत़ यामुळे दलितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ आतातरी शासनाने दलितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली़आंदोलनात वर्षा म्हैसकर, वर्षा जांभुळकर, रूपचंद सहारे, धर्मपाल गायकवाड, विनोद बोरकर, सोनू मेंढे, प्रकाश टेंभुर्णे, निलेश काळे, उत्तम चव्हाण, किशोर मेंढे, धम्मा बागडे, ईश्वर ठोंबरे, मंगेश गायकवाड, विकास मुळे, सदानंद टेंभुरकर, दीपक ढोणे, ब्राह्मणे, मनीष गोटे, विठ्ठल वाघमारे, गौरव मसुरकर आदींनी सहभाग घेतला़(शहर प्रतिनिधी)