शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टरवर रबीची पेरणी

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे

कृषी विभागाचे नियोजन : गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर झाला होता पेरावर्धा : खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे १ लाख ८ हजार ५०० हेक्टरवर पेरा होईल असे भाकीत नियोजनातून वर्तविण्यात आले आहे. कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्यांची पेरणी करण्याची तयारी झाली नसल्याचे जिल्ह्यात वास्तव आहे.साधारणत: दिवाळी झाली की रबीच्या पेरणीला प्रारंभ होतो; मात्र सध्या जिल्ह्यात तसे चित्र नाही. शेतात खरीपाचे पीक अद्याप कायम आहे. त्याची सवंगणी झाली नाही. या पिकाची कापणी करून शेतात मशागत करून रबीची पेरणी करण्यात येते. सध्या तसे चित्र नाही. रबी हंगामाकरिता कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्याचे नियोजन मात्र अद्याप तयार झाले नाही. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे हरभऱ्याचा पेरा वाढणार असल्याचा उल्लेख आराखड्यात करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात ६९ हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरण्यात येईल असा अंदाज कृषी विभागाच्या आराखड्यात तयार करण्यात आला आहे. गत वर्षी जिल्ह्यात ४० हजार ३३ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. केवळ हरभराच नाही तर गहू , रबी ज्वारी व इतर पिकांच्या पेरण्यातही वाढ होणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यात नमूद आहे. यंदा ३३ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. तर गत हंगामात २४ हजार ७५२ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. २ हजार ५०० हेक्टरवर रबी ज्वारी होणार असून गत वर्षी ११ हजार ७८ हेक्टरवर पेरा झाला होता. इतर पिके १ हजार हेक्टरवर पेरण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)