शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबादवरून मध्यप्रदेशात जाणारे मजूर वर्ध्यात ‘क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन धर्मशाळेत ठेवल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देपाच दिवसांत पायदळ पूर्ण केला ४५० किलोमीटरचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे सर्वच लॉकडाऊन... त्यातच हाताला काम नाही... भुकेची आग झोपू देत नाही... खिशातही नाममात्र पैसे अशाच परिस्थितीत हतबल झालेल्या १४ मजुरांनी हैद्राबाद येथून पायदळ मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जाण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. तब्बल सुमारे ४५० किमीचा प्रवास पूर्ण करून वर्धा गाठलेले हे मजूर गस्तीवर असलेल्या वर्धा शहर पोलिसांच्या चमूला दिसल्यानंतर त्यांना विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्यांचा गैरसमज दूर करून त्यांची आरोग्य तपासणी करीत सदर मजुरांना मदनमोहन धर्मशाळेत ठेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहर पोलिसांनी महिला आश्रम परिसरातून २५ ते ३० वयोगटातील १४ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केल्यानंतर ते मुळचे मध्यप्रदेशातील छिंडवाडा येथील असल्याचे आणि रोजगारानिमित्त ते मागील काही दिवसांपासून हैद्राबाद येथे वास्तव्याला होते अशी माहिती पुढे आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर हातावर पोट असलेल्या या मजूरांचा रोजगारच हिरावल्याचे आणि दळणवळणाची साधने बंद असल्याने ते त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी हैद्राबाद येथून पायदळच निघाल्याची माहिती या मजुरांनी पोलिसांना दिली. हे १४ मजूर १ एप्रिलला हैद्राबाद येथून निघाले.तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन धर्मशाळेत ठेवल्याचे सांगण्यात आले.मुख्य मार्गाने प्रवास टाळायचेहैद्राबाद येथून निघालेले हे १४ मजूर मुख्य मार्गाने प्रवास करण्याचे टाळत वर्धेपर्यंत पोहोचले. पण वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरात ते गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना मदनमोहन धर्मशाळा या निवारागृहात ठेवण्यात आले आहे.हैद्राबाद येथून छिंदवाडा (मध्यप्रदेश)कडे जाणाºया १४ मजुरांना ताब्यात घेत आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. सुमारे ४५० किमीचा पायदळ प्रवास पूर्ण करून वर्ध्यात पोहोचलेले हे मजूर मुख्य मार्गांनी प्रवास करण्याचे टाळत होते. त्यांच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.- योगेश पारधी, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या