शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पी.व्ही. टेक्सटाईल्सने भागविली ग्रामीण रुग्णालयाची तहान

By admin | Updated: May 26, 2016 00:35 IST

ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त वाचताच सामाजिक दायित्वाचा हात समोर करीत पी.व्ही. टेक्सटाईल्स जामने ...

समुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त वाचताच सामाजिक दायित्वाचा हात समोर करीत पी.व्ही. टेक्सटाईल्स जामने बोरवेलच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची तहान भागविली. या कंपनीने ‘जलमित्र’ झाल्याचाच परिचय दिला आहे.ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त पी.व्ही. टेक्सटाईल्सचे व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे यांनी वाचले. यावरून त्यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी चर्चा करून पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. तेव्हा ग्रामीण रुग्णालयात बोरवेल तयार करण्याबाबत ठरले. तसा प्रस्ताव शहाणे यांनी पी.व्ही. टेक्सटाईल्सचे संचालक अरुण मोहता यांच्यासमोर ठेवला. त्यांनी त्वरित बोरवेलसाठी मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात बोरवेलचे काम सुरू झाले. शिवाय दोन इंच पाणीही लागले. सदर बोरवेल पूजनाप्रसंगी व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे, नगर पंचायत अध्यक्ष शीला सोनारे, उपाध्यक्ष रवींद्र झाडे, पाणी पुरवठा सभापती गजानन राऊत, नगरसेवक प्रवीण चौधरी, प्रा. मेघश्याम ढाकरे, सुधीर खडसे, कुलकर्णी, मनीष गांधी, अतुल बावणे, धोटे आदी उपस्थित होते. यावेळी रुग्ण व नागरिकांनी जलमित्र कंपनीबाबत समाधान व्यक्त केले. रुग्णालयाचे अधिकारी हजर राहू शकले नाही.(तालुका प्रतिनिधी)